नाशिक : सातपूरकरांनी अनुभवला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धगधगता जीवनपट

महानाट्य सादर करताना कलाकार,www.pudhari.news
महानाट्य सादर करताना कलाकार,www.pudhari.news

नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा ; एक शहर एक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भीम महोत्सव समिती सातपूर  आयोजित डॉ. भीमराव महानाट्यच्या माध्यमातून सर्व धर्मीय नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धगधगता जीवनपट अनुभवला.

या महानाटकात डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' यांच्या जीवनाशी निगडित महत्वाचे पैलू दाखवण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापूर्वीच्या काळापासून जन्म, शालेय शिक्षण, विवाह, परदेशातील शिक्षण, बडोद्याचे महाराज यांच्याकडे केलेली नोकरी, अस्पृश्यांसाठी केलेले आंदोलन, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृति दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, गोलमेज परिषद, पुणे करार, धर्मांतराची घोषणा यासह विविध घटना व प्रसंगाचा समावेश या महानाट्यात होता.

या महानाट्याची सुरवात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर पाटील, स्वागताध्यक्ष सलीम शेख, आमदार सीमा हिरे, उद्घाटक इंदुमती नागरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, सतिष घोटेकर, भीम महोत्सव समितीचे रवी काळे, काका काळे, अरुण काळे, योगेश शेवरे, विक्रम नागरे आदीच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंदर बुद्ध वंदना घेत या महानाट्यास सुरवात करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित पाहुण्यांना स्मृति चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या महानाट्याचे दिग्दर्शन शैलेंद्र कृष्ण बागडे यांनी केले असून यात 151 कलाकारांनी सहभाग आहे. डॉ. आंबेडकरांची भूमिका सुधीर पाटील यांनी केली. तर त्यांच्या वडिलांची भूमिका मिलिंद रामटेके यांनी केली आहे. तसेच अशोक गवळी, माया मांडले, बशीर खान, अशोक वाचणेकर, सम्राट गोटेकर, महेश कासलीकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रकाश योजना मंगेश विजयकर, संगीत भूपेश सवाई आणि मेकअप नकुल श्रीवास यांनी केला.

या कार्यक्रमाप्रसंगी भन्ते सुगत, रविंद्र धिवरे, भिवानंद काळे, बजरंग शिंदे, पंडित नेटवटे, बाळा निगळ, संजय जाधव, बंटी लभडे, योगेश गांगुर्डे, नंदू जाधव, अर्जुन धोत्रे, अविनाश शिंदे, नयना गांगुर्डे, ज्योती शिंदे, सविता काळे, सुजता काळे, माया काळे, गीता जाधव यासह भीम उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news