अजबच!! गर्लफ्रेंड की आयपीएल?
मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सला सात गडी राखून दणका दिला. याच सामन्यात एका चाहत्याने झळकावलेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. दिवसेंदिवस क्रिकेटज्वर वाढताना दिसत आहे.
या चाहत्याने भरमैदानात झळकावलेल्या पोस्टरमध्ये लिहिले होते की, माझ्या गर्लफ्रेंडने आयपीएल किंवा ती यापैकी एकाची निवड करायला सांगितले आणि मी आयपीएल बघायला आलो! याआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंंगलोर यांच्यातील सामन्यादरम्यान एक महिला प्रेक्षक चर्चेत आली होती. जोपर्यंत आरसीबीचा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असे पोस्टर त्या तरुणीने भरमैदानात झळकावले होते.
बहार-विशेष : चेहरा वेगळा, मुखवटा तोच https://t.co/swheLeSNsLबहार-विशेष-चेहरा-वेगळा-मुखवटा-तोच/ar #pudharinews #pudharionline @dryogeshjadhav
— Pudhari (@pudharionline) April 17, 2022
त्यानंतर गुजरात आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात एका चाहत्याने पोस्टरच्या माध्यमातून गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला आव्हान दिले होते. त्या सामन्यात हार्दिकने अर्धशतक ठोकले, तर मी नोकरी सोडेन, असे त्या व्यक्तीने पोस्टरमध्ये लिहिले होते. विशेष म्हणजे, त्या सामन्यात हार्दिकने 42 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यानंतर संबंधित चाहत्याने नोकरी सोडली किंवा कसे, हे कळायला मार्ग नाही.
हेही वाचा