बलात्कार प्रकरण : चित्रा वाघ यांच्याविरोधात कुचिक यांचा दावा | पुढारी

बलात्कार प्रकरण : चित्रा वाघ यांच्याविरोधात कुचिक यांचा दावा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘बलात्कार प्रकरणात चित्रा वाघ माझी बदनामी करीत आहेत. त्यांनी माझ्या अब्रुनुकसानीची भरपाई द्यावी’, या आशयाची नोटीस शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांच्यामार्फत चित्रा वाघ यांना पाठविली आहे. तसेच याबाबत आपण वाघ यांच्याविरोधात दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

यंदा देशात ९९ टक्के पाऊस, हवामान विभागाकडून मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर

बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करीत कुचिक यांच्यावर जोरदार हल्ला करणार्‍या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा वाघ यांना कुचिक यांनी नोटीस बाजवली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी पाठवलेली ही नोटीस वाघ यांना बुधवारी सकाळी मिळाली. न्यायालयाने मला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट असल्याचेही कुचिक यांनी सांगितले.

रायगड : पत्नीच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्‍या पतीची पोलीस ठाण्यात आत्महत्या

म्हणून पाठवली नोटीस…

गुन्हा दाखल झाल्यानंतर वाघ यांनी कुचिक यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्याविरुद्ध रान पेटविले होते. कुचिक यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यावरही वाघ यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यासाठी वाघ यांनी पुण्यातील भाजप कार्यालयात दोनदा पत्रकार परिषद घेऊन कुचिक यांच्यावर आरोप केले होते. त्याचबरोबर कुचिक व संबंधित तरुणीमध्ये झालेले मोबाईल चॅट पुढे आणून कुचिक यांच्यासह पुणे पोलिस व महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. त्या सर्व पार्श्वभूमीवर ही नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. निंबाळकर यांनी दिली.

चेन्‍नई : व्हर्च्युअल सुनावणीत महिलेशी अंगलट भोवली; वकिलाला होणार २ आठवड्यांचा तुरुंगवास

वाघ यांनी टि्वट करून याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये वाघ यांनी लिहिली आहे की, ‘बुधवारी सकाळीच कुचिकचे वकील हर्षद निंबाळकर यांची मला नोटीस आली. दुसरीकडे माझ्यावर कसा गुन्हा दाखल करता येईल, यावर खलबतं सुरू आहेत. हा सगळा निव्वळ योगायोग नाही का?’

Back to top button