चेन्‍नई : व्हर्च्युअल सुनावणीत महिलेशी अंगलट भोवली; वकिलाला होणार २ आठवड्यांचा तुरुंगवास | पुढारी

चेन्‍नई : व्हर्च्युअल सुनावणीत महिलेशी अंगलट भोवली; वकिलाला होणार २ आठवड्यांचा तुरुंगवास

चेन्‍नई , पुढारी ऑनलाईन : न्यायालयीन कामकाजादरम्यान व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे एका महिलेशी तडजोड केल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने वकील आर. डी. संथाना कृष्णण यांना २ आठवड्यांची तुरुंगवासाठी शिक्षा आणि ६ हजार रुपये दंड ठोठवला आहे. हा आदेश खंडपीठाचे सदस्य न्यायमूर्ती पी. एन प्रकाश आणि ए. ए. नक्कीराम यांनी दिला आहे.

व्हिडीओ काॅन्फरन्सची घटना ही डिसेंबर २०२१ रोजी घडली. ज्या महिलेसोबत वकील आर. डी. संथाना कृष्णण गैरवर्तवणूक करताना दिसले होते. त्या महिलेला प्रकरणात योग्य मोबदला मिळायला हवा, असे मत संबंधित खंडपीठाने नोंदविल्यानंतर कृष्णन यांनी ४ लाख रुपये दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडू राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्याकडे हे पैसे देण्यात आले, त्यानंतर ते पैसे महिलेकडे सुपुर्द करण्यात आले.

आदेशात म्हटलं आहे की, “तामिळनाडू राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांनी सादर केलेल्या अहवालानुसार वकील संथाना कृष्णन यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेले आहे. त्यांचा डिमांड ड्राफ्ट ‘एक्स’कडे सोपविण्यात आली आहे. ज्याची खात्री सीबी-सीआयडी यांच्याद्वारे करण्यात आली आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने संथाना कृष्णन यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. जेव्हा ते आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले.  त्यावेळी या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश जी. के. इलांथिरैया यांच्या खंडपीठाकडून आभासी प्रक्रियेद्वारेच केली जात होती. याचिकाकर्त्याने न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना म्हटले की, “मी न्यायालयाचा सन्मान करतो. मात्र तांत्रिक गडबडीमुळे माझ्याकडून ही चूक झाली. या घटनेदरम्यान याचिकाकर्ताच्या लॅपटाॅपचा कॅमेरा सुरू होता. यामध्ये न्यायालयाचा अवमान करण्याचा उद्देश नव्हता.” हा युक्तीवाद न्यायालयाने नाकारला.

न्यायालयाने स्पष्ट केले की, “एक्स नावाच्या व्यक्तीला अवमान याचिकेत सहभागी करून घेतले नव्हते. कारण, संबंधित व्यक्ती ही गरीब पार्श्वभूमीतून येते आणि प्रतिकूल परिस्थितीची बळी ठरली होती. त्यामुळे ही व्यक्ती संथाना कृष्णन यांच्या खोटेपणाची शिकार झाली.” न्यायालयाने पीडितेच्या दुर्दशेवर लक्ष केंद्रीत केले होते.

Back to top button