Homosexuality : समलैंगिक असल्‍याची माहिती लपविणार्‍या पतीला काेर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला | पुढारी

Homosexuality : समलैंगिक असल्‍याची माहिती लपविणार्‍या पतीला काेर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘समाजात तुम्‍ही कसं जगता याच्‍यामध्‍ये कोणीही हस्‍तक्षेप करु शकत नाही, याचा अर्थ असा होत नाही की, तुम्‍ही तुमच्‍या पत्‍नीचे आयुष्‍य उद्‍ध्‍वस्‍त करु शकता, असे स्‍पष्‍ट करत ठाणे न्‍यायालयाचे अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश आरएस गुप्‍ता यांनी समलैंगिक ( Homosexuality )  असल्‍याची माहिती पत्‍नीपासून लपविणार्‍या ३२ वर्षीय पतीचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला. संबंधित व्‍यक्‍तीने आपल्‍या पत्‍नीची फसवणूक करत तिचे भविष्‍य उद्‍ध्‍वस्‍त केले, असे निरीक्षणही न्‍यायाधीशांनी नोंदवले.

Homosexuality : समलैंगिक असल्‍याची माहिती लपवलीच आर्थिक फसवणुकही

पीडितेच्‍या वकिलांनी न्‍यायालयात युक्‍तीवाद करताना सांगितले की, ३२ वर्षीय तरुणाची सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून तरुणीशी ओळख झाली.संबंधित तरुणाने आपल्‍या दीड लाखांच्‍या पगार असल्‍याची बतावणी केली. दोघांनी नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये विवाह केला. यानंतर काही दिवसांमध्‍ये पत्‍नीचे वागणूक संशयास्‍पद वाटू लागले. पत्‍नीने त्‍याचा व्‍हॉटसॲपवरील मेसेज तपासले. यावेळी त्‍याचे मुंबईतील दोन पुरुषांबरोबर संबंध असल्‍याची माहिती तिला मिळाली. पतीने समलैंगिक असल्‍याची माहिती लपवलीत तक्रारदार पत्‍नीचे आयुष्‍य उद्‍ध्‍वस्‍त केलेच. त्‍याचबरोबर तिच्‍या पालकांची आर्थिक फसवणुकही केली. ही माहिती पोलिस तपासात समोर आली आहे, असेही वकिलांनी  न्‍यायालयास सांगितले.

जाणीवपूर्वक त्रास देण्‍याचा हा प्रयत्‍न असून अटकपूर्व जामीन मंजूर करावा, असा युक्‍तीवाद पतीच्‍या वकिलांनी यावेळी केला.

विवाह एक पवित्र संस्‍कार

दोन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद पूर्ण झाल्‍यानंतर अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश आरएस गुप्‍ता म्‍हणाले, ” हिंदू धर्मात विवाह हा पवित्र
संस्‍कार आहे. यामध्‍ये पुरुष आणि महिला एका नात्‍याच्‍या बंधनात कायमस्‍वरुपी गुंफले जातात. पती-पत्‍नीचे नाते हे धर्मानुसार शारीरिक, सामाजिक आणि आध्‍यात्‍मिक पातळीवर असते. विवाहामध्‍ये झालेली फसवणूक ही केवळ आर्थिक नुकसान नसते तर एका तरुणीचे वैवाहिक जीवन उद्‍ध्‍वस्‍त होते. पतीने विवाहपूर्वीच पत्‍नीला आपण समलैंगिक असल्‍याचे सांगितले असते तर याकडे या प्रकरणाकडे वेगळ्या पद्‍धतीने पाहता आले असते. समाजात जगत असताना प्रत्‍येकाला आपला व्‍यक्‍तिगत सन्‍मान अबाधित ठेवावा. याबाबत कोणालाच शंका असल्‍याची गरज नाही. तुम्‍ही कसं जगता याच्‍यामध्‍ये कोणीही हस्‍तक्षेप करु शकत नाही, याचा अर्थ असा होत नाही की, तुम्‍ही तुमच्‍या पत्‍नीचे आयुष्‍य उद्‍ध्‍वस्‍त करु शकत नाही”, असे स्‍पष्‍ट करत न्‍यायाधीश आरएस गुप्‍ता यांनी संबंधित पतीचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला.

हेही वाचा:

 

 

Back to top button