नाशिक शहरात पंधरा दिवस जमावबंदी ; जाणून घ्या कारण | पुढारी

नाशिक शहरात पंधरा दिवस जमावबंदी ; जाणून घ्या कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी बुधवारी (दि. 6) मध्यरात्री 12 पासून 20 एप्रिलच्या मध्यरात्री 12 पर्यंत शहरात जमावबंदीचा आदेश काढला आहे. त्यामुळे रामनवमी, रामरथ- गरुडरथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे व हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना नागरिकांना कार्यक्रम घेण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक झाले आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पाण्डेय यांनी दिला आहे.

पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी काढलेल्या आदेशानुसार मोर्चे, निदर्शने, धरणे आंदोलन, धार्मिक सण-उत्सव यासह देशात कोठेही जातीय घटना घडल्यास त्याचे पडसाद शहरात उमटण्याची शक्यता असते. त्यातच 10 ते 16 एप्रिलदरम्यान विविध सण, उत्सव, जयंती असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी खबरदारी म्हणून जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

हेही वाचा :

Back to top button