कल्याण : तहसीलदार कार्यालयातील आणखी एक क्लार्क ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

कल्याण : तहसीलदार कार्यालयातील आणखी एक क्लार्क 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

कल्याण : पुढारी वृत्तसेवा : कल्याण तहसील कार्यालयातील लेखनिक अमुता बडगुजर आणि खासगी सहाय्यक अनंत भास्कर कंठे यांना १५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती. ही घटना ताजी असताना आणखी एका लेखनिकाला १० हजारांची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपत विभागाने अटक केली. राजेंद्र बोराडे असे अटक केलेल्या लेखनिकाचे नांव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे गेरसे खडवली, कल्याण येथे खरेदी केलेल्या जमिनीवर अधिकार अभिलेखात सातबारावर नाव दाखल करून देण्यासाठी राजेंद्र बो-हाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बोऱ्हाडे यांना अटक करण्यात आली. तर त्यांचा खासगी सहाय्यक निलेश चौधरी याच्यावर लाचेच्या मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button