Virat Kohli : विराटने केली मॅक्सवेलची ‘बॉडी मसाज’, सोशल मीडियावर Video ची खळबळ!

Virat Kohli : विराटने केली मॅक्सवेलची ‘बॉडी मसाज’, सोशल मीडियावर Video ची खळबळ!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंगळवारी झालेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने राजस्थान रॉयल्सचा ४ गडी राखून पराभव केला. या सामन्यादरम्यान असे काही घडले, ज्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. खरंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या फलंदाजीदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) ड्रेसिंग रूममध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या शरीराची मालिश करताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) बोलायचे झाले तर तो या सामन्यात काही खास करू शकला नाही आणि ५ धावा करून बाद झाला. आऊट झाल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये ग्लेन मॅक्सवेलला बॉडी मसाज देताना दिसला. विराट कोहली समोर खुर्चीय बसलेल्या ग्लेन मॅक्सवेलच्या पाठीवर हाताने मारत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मॅक्सवेल या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता.

मॅक्सवेल ९ एप्रिलला खेळू शकतो..

ग्लेन मॅक्सवेल ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो. मॅक्सवेलने ९७ आयपीएल सामन्यांमध्ये २२ विकेट घेतल्या असून २०१८ धावाही केल्या आहेत. आरसीबीचा स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल त्याच्या झंझावाती फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना नेस्तनाबूत करतो. याचा नमुना आपण आयपीएलच्या गेल्या काही हंगामात पाहिला आहे. (Virat Kohli)

ग्लेन मॅक्सवेलच्या आगमनाने इतर संघही घाबरले आहेत. या खेळाडूमध्ये संपूर्ण सामना स्वत:च्या जोरावर फिरवण्याची ताकद आहे. मॅक्सवेल फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात निष्णात आहे. मॅक्सवेलने नेहमीच आपल्या किलर बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगने कहर करत प्रेक्षकांचे मनोरंजनही केले आहे. (Virat Kohli)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news