DailyHunt : ‘डेलीहंट’ चालवणाऱ्या VerSe Innovation ने पार केला ८० कोटी डॉलर्सचा टप्पा | पुढारी

DailyHunt : 'डेलीहंट' चालवणाऱ्या VerSe Innovation ने पार केला ८० कोटी डॉलर्सचा टप्पा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘डेलीहंट’ (Dailyhunt) या न्यूज वेब प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी असलेल्या VerSe Innovation (व्हर्से इनोव्हेशन) ने 5 अब्ज डॉलरच्या valuation मधून तब्बल 805 दशलक्ष डॉलर्सचा (८० कोटी डॉलर्स) टप्पा पार करुन एक नवीन इतिहास रचला आहे. VerSe Innovation (व्हर्से इनोव्हेशन) या कंपनीने आपल्या Artificial intelligence/Machine learning करण्यासाठी लाईव्ह आणि स्ट्रीमिंग आणि वेब 3.0 यांसारख्या स्टार्ट अप प्रकल्पातून मोठी उलाढाल केली आहे. या निधीच्या माध्यमातून कंपनीला शेअर चॅट सारख्या सम प्रतिस्पर्धीसोबत तसेच इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या जागतिक प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्यासाठी मदत करेल.

कटेंन्ट, न्यूजसाठी असलेले डेलीहंट (Dailyhunt) आणि शॉर्ट व्हिडिओसाठी असलेले जोश अॅप यांचे पालकत्व हे VerSe Innovation (व्हर्से इनोव्हेशन) कडे आहे. हे भारतीय स्टार्ट अप (Start Up) सध्या जगात नाव कमावत आहे. केंद्र सरकारनेही या स्टार्टअपला पाठबळ दिले आहे. या मिळालेल्या यशाची माहिती कंपनीने बुधवारी (दि.०६) आपल्या युजर्सना दिली.

2007 मध्ये वीरेंद्र गुप्ता आणि शैलेंद्र शर्मा यांनी व्हर्से इनोव्हेशनची स्थापना केली होती. आताच्या काळात कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करताना गुंतवणूकदार शहाणिशा आणि सावधगिरी बाळगूनच गुंतवणूक करत असतात. अशा परिस्थितही डेलीहंट आणि व्हर्से इनोव्हेशनने मिळवलेले हे सर्वात मोठे यश आहे. या यादीमध्ये 805 दशलक्ष डॉलर्सची उलाढाल करत डेलीहंट अव्वल स्थानी आहे, तर स्विगीनेही 700 दशलक्ष डॉलर्स उलाढाल केली आहे. 400 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्यांत पॉलिगॉन, बायजू आणि युनिफोर या या कंपन्यांचा समावेश आहे.

लाईव्ह कॉमर्स, वेब3

व्हर्से इनोव्हेशन येत्या काही आठवड्यांत थेट व्यावसायिक लाईव्ह प्लॅटफॉर्म सुरू करत आहे. Flipkart शी भागीदारी करत ShareChat’s Moj यांनी व्यावसायिक लाईव्ह प्लॅटफॉर्म गेल्या ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू केले आहे. त्याला फाईट देण्यासाठी लवकरच डेलीहंटचा व्यावसायिक लाईव्ह प्लॅटफॉर्मला आणला जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सध्या डेलीहंटचे 350 दशलक्षांहून अधिक युजर्स आहेत. जोश या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मचे 150 दशलक्ष मासिक सक्रिय युजर्स आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button