नाशिकमध्ये मराठी युवा साहित्य संमेलन घेण्याचा मानस : विश्वास ठाकूर | पुढारी

नाशिकमध्ये मराठी युवा साहित्य संमेलन घेण्याचा मानस : विश्वास ठाकूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चाळीस समित्यांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम पाहणाऱ्या ३५० हून अधिक युवक-युवतींचा प्रमाणपत्र गौरव सोहळा उत्साहात झाला. शहरात लवकरच युवा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस असल्याचे सर्व समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

प्रमुख पाहुणे म्हणून रमेश देशमुख, डॉ शंकर बोऱ्हाडे, विनायक रानडे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते. यावेळी ठाकूर म्हणाले, साहित्य संमेलनात अनेक नवीन सहकारी जोडले गेले. हे साहित्य संमेलन एका अर्थाने ऐतिहासिक ठरले. आताची तरुण पिढी सक्षम असून त्यांच्यात नवनिर्मितीची क्षमता आहे. तरुणांनी आपल्या क्षमतेचा योग्य वापर केल्यास अशक्य काही नाही. रमेश देशमुख यांच्या वतीने संमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल विश्वास ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. बोऱ्हाडे म्हणाले की, माणसे जोडणे, त्यांच्याकडून विश्वासाने काम करवून घेऊन कामाप्रती त्यांच्यात आनंद निर्माण करण्याचे कौशल्य ठाकूर यांच्याकडे आहे. त्यातून हे संमेलन यशस्वी झाले. श्रुती गायकवाड, अनिकेत कोते, आदीती मुळे, प्रणाली रेडगावकर, स्नेहल नेवे, ओम कासार, सिद्दी वाघ, योगेश अडकीने, इशा वडनेरे, निधी काकडनी यांचा उकृष्ट स्वयंसेवक म्हणून विशेष गौरव करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष मोरे, भूषण काळे, वैभव गांगुर्डे, राहुल वाणी, प्रसाद लवटे, जानवी शेलार, सर्वेश साबळे, शुभम शेंडे यांनी परिश्रम घेतले. साक्षी घोडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हेही वाचा :

Back to top button