पुणे : रस्त्यावर धावणार्‍या पीएमपीत फक्त 80 ची भर

पुणे : रस्त्यावर धावणार्‍या पीएमपीत फक्त 80 ची भर
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : सन 2017 – पीएमपी बसची संख्या – 2 हजार 45. सन 2022 – पीएमपी बसची संख्या – 2 हजार 125… याचाच अर्थ पीएमपीच्या रस्त्यावर धावणार्‍या बसगाड्यांची संख्या 5 वर्षांत फक्त 80 ने वाढली आहे. पीएमपीने पाच वर्षांच्या काळात 1 हजार 246 नव्या गाड्यांची खरेदी केली, तर 898 आयुर्मान संपलेल्या गाड्या भंगारात काढल्या. पुण्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात आता 3 हजार 500 गाड्या आवश्यक असताना पीएमपी प्रशासनाकडून गेल्या पाच वर्षांत कोणतीही ठोस पावले उचण्यात आली नसल्याचे दिसते.

पुणे महानगर परिवहन महामंडळाने इंधनावरील गाड्या कमी करून पर्यावरणपूरक ई-बसच्या दिशेने पाऊल टाकले आहे. लवकरच पीएमपी आता प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतूक म्हणून ओळख मिळवेल. पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये पीएमपीच्या ताफ्यातील बस डिझेलवर धावणार्‍या होत्या. त्यात कालांतराने सीएनजी बसचा समावेश झाला. आणि आता इलेक्ट्रिक बसच्या दिशेने पाऊल पडत आहे.

पीएमपीच्या गाड्यांमध्ये मोठे बदल झाले असून, बस गाड्यांच्या रंगसंगतीमध्येदेखील बदल झाले आहेत. लाल पिवळ्या पट्ट्याची पीएमपी बस ते आता हिरवी आणि पांढर्‍या रंगाची बस पाहायला मिळते. तसेच बसच्या रचनेत आणि त्यातील सुविधांमध्ये खूपच बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी रस्त्यावरील गाड्यांची संख्या मात्र म्हणावी तशी गरजेइतकी वाढविता आलेली नसल्याचे दिसत आहे.

  • नवीन आलेल्या बस – 1246

  • नवीन येणार्‍या बस – 357

  • एकूण बस – 1603

भंगारात काढलेल्या बस

  • 2017-18 – 98 गाड्या
  • 2018- 19 – 146 गाड्या
  • 2019-20 – 161 गाड्या
  • 2020-21 – 134 गाड्या
  • 2021-22 – 359 गाड्या

2022 मधील पीएमपी बसची संख्या

  • स्वमालकीच्या – 1 156
  • भाडेतत्त्वावरील – 969
  • एकूण – 2 हजार 125

2017 मधील पीएमपी बसची संख्या

  • पीएमपी स्वमालकीच्या – 1192
  • पीपीपी तत्त्वावरील – 200
  • भाडेतत्त्वावरील 653
  • एकूण बससंख्या – 2045

गाड्यांची स्थिती

  • डिझेल – 287
  • सीएनजी – 789
  • ई-बस – 180

पाच वर्षांत बसमध्ये झालेले बदल

  • बीआरटी बसमध्ये – दोन्ही बाजूस स्लायडिंग दरवाजे
  • स्ट्रक्चरमध्ये बदल (बांधणी)
  • विविध रंगसंगतीच्या बस
  • वातानुकूलित (एसी) बस
  • अपंगांसाठी सुविधा आल्या
  • आयटीएमएस सुविधा
  • सीसीटीव्ही
  • सीट्ससाठी सुविधा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news