पुणे : सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने | पुढारी

पुणे : सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने

पुणे : पुढारी वृत्तसेवा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने आणि उपाध्यक्ष म्हणून नितीन राऊत यांची नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.

मी तुमच्यासोबत येतो, मला तुरुंगात टाका ! उद्धव ठाकरेंकडून भाजपला थेट आव्हान

रासने बॅंकेचे ज्येष्ठ संचालक असून, सन २००९ ते २०११ या कालावधी त्यांनी बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कारकिर्दीत बॅंकेने ‘नॉन परफॉर्मिंग ॲसेटस’चे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळविले होते. रासने महापालिकेच्या स्थायी समितीचे सलग चार वेळा अध्यक्ष होते. महापालिकेला कोरोना काळातही विक्रमी महसूल उत्पन्न जमा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख म्हणूनही रासने कार्यरत आहेत.

MLA Houses : राजू पाटील म्हणतात, त्यापेक्षा २०० युनिट वीज मोफत द्या तर प्रणिती शिंदे म्हणतात, मला हे घर नकोच

 

अध्यक्षपदी निवड झाल्यावर रासने म्हणाले, ‘सध्या बॅंकेच्या २२ शाखा आणि मुख्यालय आहे. बॅंकेचा व्यवसाय १३३५ कोटी रुपये असून, ८०९ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ५२६ कोटी रुपयांची कर्जे आहेत. येत्या आर्थिक वर्षात बॅंक सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. नजिकच्या काळात बॅंकेचा शाखा विस्तार ५० पर्यंत आणि व्यवसाय पाच हजार कोटी रुपये करण्याचा निर्धार आहे. तसेच एनपीए शून्य टक्के राखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बॅंकेच्या मुख्यालयाची स्वतंत्र आणि भव्य वास्तू साकारणार आहोत.’

प्रभू रामचंद्रांचे गीत ऐकणे अपराध होत असेल तर वाईट : देवेंद्र फडणवीस यांची नाराजी

नवनिर्वाचित उपाध्यक्ष नितीन राऊत यांना बॅंकिंग कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. ट्रस्टच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि क्रीडा उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. शाहुराज हिरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Back to top button