पुढारी ऑनलाईन डेस्क : जसा लोकांच्या घरांचा प्रश्न आहे तसा लोकप्रतिनिधी यांच्या घराचाही प्रश्न आहे. राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना म्हाडाअंतर्गत 300 घरे बांधणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात माहिती दिली. यावर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर काहींनी याचे समर्थन केले आहे. याबाबत आमदार प्रणिती शिंदे, खासदार प्रियांका चतुर्वेदी, मनसे आमदार राजू पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. (MLA Houses)
याउलट शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी या म्हणाल्या की, आमदारांना मुंबईत घर मिळाले. तर त्यात चूक काय? काही ठराविक आमदारच श्रीमंत आहेत. त्यांचा टक्का फार कमी आहे. मात्र बहुतांशी आमदारांची आर्थिक स्थिती तशी नाही. अशा आमदारांना मुंबईत घर मिळालीत, तर त्यांची सोय होईल. मुंबईत येणाऱ्या आमदारांची आणि दिल्लीत येणाऱ्या खासदारांची राहण्याची सोय ही राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी असतेच.
मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांना मी कळवणार आहे, मला हे घर नको मी स्वेच्छेने हे घर देऊन टाकणार आहे. घरांसाठी बऱ्याच आमदारांची मागणी होती. अनेक आमदार ग्रामीण भागातून येतात आणि त्यांना मुंबईत घरे नसतात. माझ्यासारखे काही आमदार आहेत ज्यांची मुंबईत घरे आहे. त्यामुळे त्यांना घराची गरज नाही. मला या सदनिकेची गरज नाही.
उलट सध्या असलेल्या आमदार निवासाचा वापर माझ्या मतदारसंघातले रुग्ण, गरजू जेव्हा मुंबईत जातात तेव्हा त्याचा वापर करतात. त्याप्रमाणे ज्या आमदारांना ही घरे नको आहेत त्याचा वापर रुग्णासाठी, लोकांसाठी तसेच औषधोपचारासाठी वापरावा. आम्ही लोकांसाठी राजकारणात आलोय, त्यामुळे ज्यांना गरज नाही त्यांनी घर घेणे चुकीचे ठरेल. यामुळे मी इतर आमदारांना आवाहन करते की त्यांनी यावरील हक्क सोडावा. मुंबईत आमदारांना देण्यात येणारे स्वीकारणार नसल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदेंनी दिली.
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. यावर माझे स्पष्ट मत आहे. आमदारांना मिळणारी घरे ही मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत अधिक बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे. अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. आमदारांना मोफत घरे कशासाठी? जी घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या आणि जनतेचे आशीर्वाद मिळवा, असे राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सरकार डळमळीत असल्याने आमिष म्हणून आमदारांना घरं द्यायची आहे का? सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आमदारांना फुकटची घरं का?" असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला.