Urfi Javed : उर्फी जावेद तिच्या कपड्यावरून नव्हे तर वडापावमुळे चर्चेत | पुढारी

Urfi Javed : उर्फी जावेद तिच्या कपड्यावरून नव्हे तर वडापावमुळे चर्चेत

पुढारी ऑनलाईन : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईल आणि हॉट फोटोमुळे चर्चेत असते. तर सध्या ती कपड्यावरून नव्हे तर वडापावमुळे चर्चेत आली आहे. उर्फीचा वडापाववर ताव मारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच घारेवर धरले आहे. याच दरम्यान उर्फीची मैत्रीण आणि अभिनेत्री राखी सावंतने उर्फी असे कपडे का परिधान करते? याचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर एक ग्रीन रंगाच्या बिकिनीसोबत खाकी रंगाच्या पॅन्टमध्ये फोटोशूट केले आहे. यावेळी तिने एका भितींचा वापर करत हटके पोझ दिली आहे. उर्फी नेहमी आपल्या कपड्यावरून नेहमी सोशल मीडियावर चर्चेत येत असते. नेटकरी तिला कपड्यावरून ट्रोल देखील करत असतात.

परंतु, सध्या उर्फी तिच्या अतरंगी कपड्यावरून नव्हे तर एका वडापाववर ताव मारताना चर्चेत आली आहे. ग्रीन रंगाच्या बिकिनीसोबत फोटोशूट करताना तिने एका महिलेच्या हातातील वडापाव घेतल्याचे दिसते. यानंतर मात्र, उर्फीला मोह आवरला नाही तिने कॅमेऱ्याकडे न पाहताच वडापाववर ताव मारला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘#urfijaved #vadapao’असे लिहिले आहे. वडापाव खाताना उर्फी बंगल्याच्या गेटवर दिसली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी नेहमी प्रमाणे भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने ‘हिला किती वेळा सांगयचे की कपडे नीट घाल’, तर दुसऱ्या एका युजर्सने ‘उर्फी वडापाव खाण्यात गुंग आहे’ असे म्हटले आहे. याशिवाय आणखी काही युजर्सनी प्रतिक्रिया देत हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

उर्फी जावेद नेहमी सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर करून सक्रिय असते. याआधी तिने लाल रंगाच्या ड्रेससोबत सोनेरी रंगाच्या साडीत दिसली आहे. याच दरम्यान उर्फीची मैत्रीण आणि अभिनेत्री राखी सावंतने अतरंगी कपडे का परिधान करते? याचा खुलासा केला आहे.

यात राखीने म्हटले आहे की, ‘ती गरीब मुलगी एकटी आहे, माझी चांगली मैत्रीण आहे. बिग बॉसमध्ये आल्यानंतर तिला पहिल्या आठवड्यात बाहेर पडावं लागलं. यानंतर ती कुठे जाणार होती?, येथे चित्रपट सहज मिळत नाहीत, त्यामुळे ती फॅशनकडे वळत वेगवेगळे फोटोशूट करते. ती सर्व कपडे स्वतःच्या हाताने बनवते, त्यासाठी ती खूपच मेहनत घेत असते. एखाद्या निर्मात्याने पाहिले तर चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल या आशेने ती सर्व काही करत असते. अशा कष्टाने धडपडणाऱ्या मुलीच्या मी पाठीशी उभी आहे असे राखीने सांगितले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

Back to top button