सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइनच | पुढारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइनच

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आगामी सत्राच्या (जून 2022) परीक्षा ऑफलाइन (लेखी) पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतला आहे.

या परीक्षेबाबत वेळापत्रक, मार्गदर्शक सूचना, परीक्षेच्या संबंधित माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा हव्याहव्याशा वाटणार्‍या विद्यार्थ्यांना आता ऑफलाइन परीक्षेची तयारी करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

द काश्मीर फाईल्स यू-ट्यूबवर दाखवा, टॅक्स फ्रीची गरज काय?; केजरीवाल संतप्त

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साधारण पावणे दोन वर्षे राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये बंद होती. या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाले. या पार्श्वभूमीवर सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सोपे एमसीक्यू प्रश्न विचारण्यात येत होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देण्याची मुभा होती. त्यामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून, या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केले. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षांचा दर्जा टिकवण्यासाठी आगामी सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला आहे.

Petrol Diesel prices hike : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ

त्यानुसार विद्यापीठात; तसेच संलग्न महाविद्यालयातील पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. त्याचप्रमाणे महाविद्यालय पातळीवरील अंतर्गत परीक्षा, इनसेम, प्रात्यक्षिक, मौखिक, सेमिनार, मिनी प्रोजेक्ट, प्रोजेक्ट, डेझर्टेशन आदी परीक्षा केंद्रांवर कोरोनापूर्व परिस्थितीनुसार नेहमीप्रमाणे होतील. याबाबतची नोंद संलग्न महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांनी घ्यावी, अशी माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे.

कर्नाटक : खानापूर म. ए. समितीत एकी; दुभंगलेली मने चार वर्षांनंतर एकत्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आगामी अंतिम सत्र परीक्षा ऑफलाइन म्हणजेच लेखी पद्धतीने परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून संलग्न महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. त्यानुसार परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने ऑफलाइन परीक्षेची तयारी सुरू केली आहे.
                                        – डॉ. महेश काकडे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ

हेही वाचा

Mamata Banerjee : आधुनिक बंगालमध्ये एवढा रानटीपणा कोठून आला, ममतांचा संतप्त सवाल

शिमला, मनाली या थंड हवेच्या ठिकाणी मोडले तापमानाचे विक्रम

मालदीवच्या पाण्याला सनीने लावली आग

Back to top button