सोलार ऑर्बिटर शनिवारी पोहोचणार सूर्यानजीक | पुढारी

सोलार ऑर्बिटर शनिवारी पोहोचणार सूर्यानजीक

लंडन : युरोपियन स्पेस एजन्सीचे ‘सोलार ऑर्बिटर’ येत्या 26 मार्च रोजी सूर्यानजीक पोहोचणार आहे. या स्पेस एजन्सीच्या माहितीनुसार हा एक सूर्याच्या अगदी जवळ पोहोचण्याचा प्रयत्न असेल. यावेळी सूर्य आणि सोलार ऑर्बिटर यांच्यातील अंतर पाच कोटी कि.मी. इतके असेल. सोलार ऑर्बिटरचा हा प्रवास बुधाच्या कक्षेतून होणार आहे.

‘सोलार ऑर्बिटर’ अनेक प्रकारचे प्रयोग करत आहे. जेणेकरून सूर्याजवळून जाताना अनेक प्रकारचे आवाज व व्हिडीओ रेकॉर्ड करता येतील. याशिवाय सूर्यापासून बाहेर पडणारे कोरोनल मास इजेक्शन, सोलार फ्लेयर्स आणि सौरवादळांचा अभ्यास करता येईल. खरे तर सोलर ऑर्बिटर ही एक उडती प्रयोगशाळा असल्याने सूर्याबाबतच्या घडामोडींचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. गतसालीची हा सोलार प्रोब सूर्यानजीक पोहोचला होता.

काही दिवसांपूर्वी सोलार ऑर्बिटरजवळून एक धूमकेतू निघून गेला होता. या धूमकेतूच्या शेपटातून बाहेर पडणार्‍या पदार्थांची चाचणीही सोलार ऑर्बिटरने केली होती. या ऑर्बिटरने पुरवलेल्या माहितीनुसार धूमकेतूच्या शेपटामध्ये ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साईड, मॉलिक्युलर नायट्रोजन, कार्बन मोनोक्साईड आणि संभवता पाण्याचे कणही होते. मानवाच्या इतिहासात प्रथमच मानवाने तयार केलेले एखादे यान सूर्याच्या वातावरणात पोहोचले आहे. दरम्यान, ‘नासा’च्या पार्कर सोलार प्रोबने सूर्याच्या बाह्य वातावरणाला स्पर्श केले होते. त्यावेळी पार्कर व सूर्य यांच्यातील अंतर 1.33 कोटी कि.मी. इतके होते.

Back to top button