पुणे : महात्मा फुले योजना रुग्णांसाठी ठरतेय संजीवनी | पुढारी

पुणे : महात्मा फुले योजना रुग्णांसाठी ठरतेय संजीवनी

ज्ञानेश्वर भोंडे

पुणे : महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना कोरोनाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या 30 हजारांहून अधिक रुग्णांवर 71 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये ससून रुग्णालयात सर्वाधिक उपचार झाले आहेत.

RUSSIA-UKRAINE WAR : रशियाच्‍या हवाई हल्‍ल्‍यात युक्रेनमधील रासायनिक प्रकल्‍पाचे मोठे नुकसान, अमोनिया गॅस गळतीमुळे नागरिकांना भूमिगत होण्‍याचे आवाहन

राज्यातील सर्व रेशनकार्डधारक हे महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आहेत. पुण्यात अशी 71 रुग्णालये आहेत. यामध्ये 996 प्रकारचे उपचार या योजनेतील रुग्णालयांमध्ये मोफत होतात. यापैकी 52 खासगी, तर 19 रुग्णालये ही शासनाची आहेत.
पुणे महानगरपालिकेत या योजनेअंतर्गत एकूण 22 रुग्णालये आहेत. यामध्ये 8 शासकीय आणि 13 खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत या योजनेअंतर्गत 7 रुग्णालये आहेत. यामध्ये 2 शासकीय अणि 5 खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये योजनेअंतर्गत 42 रुग्णालये आहेत. यामध्ये 9 शासकीय आणि 33 खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.

The Kashmir Files : मी स्वत: या हत्याकांडाचा प्रत्यक्षदर्शी, काश्मिरी लेखकाने काश्मिरी पंडितांची माफी मागत सांगितले वास्तव

सध्या एकूण 71 अंगीकृत रुग्णालयांपैकी 45 रुग्णालये कोविडमध्ये काम करत आहेत. त्यापैकी 14 रुग्णालये शासकीय तर 31 रुग्णालये खासगी आहेत व उरलेली 26 रुग्णालये नॉन कोविड काम करत आहेत. सध्या योजनेअंतर्गत 30 हजार 828 कोविड रुग्णांवर उपचार झालेले असून त्यासाठी 70 कोटी 74 लाख 50 हजार 770 रुपये योजनेमार्फत मंजूर करण्यात आले आहेत.

COVID-19 update : भारताची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, पण अद्याप धोका पुर्णत: टळलेला नाही

ससूनसह पाच रुग्णालयांत सर्वाधिक उपचार

ससून रुग्णालयात सर्वाधिक उपचार झाले असून ती संख्या 6 हजार 220 आहे. त्यापाठोपाठ काशीबाई नवले रुग्णालयात 2660, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात 2586, भारती हॉस्पिटलमध्ये 2543, बाणेर जंबो कोविड रुग्णालयात 2105 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

Ram Charan : हा साऊथ स्टार आहे एका विमान कंपनीचा मालक

Back to top button