Mathura : कोण आहेत ‘कृष्णजन्मभूमी’साठी मशिदीविरुद्ध कायदेशीर लढा देणारे ‘मेहेक माहेश्वरी’? | पुढारी

Mathura : कोण आहेत 'कृष्णजन्मभूमी'साठी मशिदीविरुद्ध कायदेशीर लढा देणारे 'मेहेक माहेश्वरी'?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मथुरा येथील ‘भगवान कृष्ण जन्मस्थान’ आणि मशिद यांच्यातील कायदेशीर लढाईत, हिंदूंच्या बाजूने लढणारे “मेहेक माहेश्वरी” हे ख्यातनाम वकील आहेत. त्यांनी प्रख्यात वकील प्रशांत भूषण यांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानाच खटल्यापासून ते मथुरेतील ‘श्री कृष्ण जन्मभूमी मंदिरा’साठी कायदेशीर लढाई टक्कर आहे. यासारख्या मोठ्या खटल्यांमध्ये लढणारे 30 वर्षीय वकील मेहेक माहेश्वरी आपल्या गुरूच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जात आहेत. त्यांचे गुरू हे दुसरे तिसरे कोणी नसून राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे आहेत. जे नेहमीच कृष्ण जन्मभूमीचा संदर्भातील मुद्दा राज्यसभेत आक्रमकपणे मांडत असतात.

एका वृत्तपत्राशी बोलताना, माहेश्वरी यांनी स्वतःची ओळख ‘राष्ट्र’ आणि ‘भगवान कृष्ण’ भक्त म्हणून केली. उद्ध्वस्त झालेल्या कृष्ण मंदिरांच्या संदर्भातील कोणत्याही ऐतिहासिक सुधारणेच्या चळवळीला माझा पाठिंबा असेल, असे ते म्हणाले. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ (सध्याचं श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान) आणि शाही इदगाह मशीद याच्यातील या जमिनीसंदर्भात केस आहे. भगवान कृष्ण जन्मस्थानावर शाही इदगाह मशीद बांधली असून, सरकारने ही जागा आपल्या ताब्यात घ्यावी आणि ती हिंदूंना द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मेहेक माहेश्वरी यांनी दाखल केली होती. परंतु १९ जानेवारी २०२१ रोजी याचिकाकर्त्याच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने याचिका फेटाळली.

माहेश्वरी म्हणाले की, गेल्यावर्षी व्हिडिओ लिंक मिळवण्यात अयशस्वी झाल्यामुळे आम्ही न्यायालयात हजर राहू शकलो नाही. याचिका फेटाळल्यानंतर आम्ही लगेचच पुर्नयाचिका दाखल केली. यानंतर, १७ फेब्रुवारी,२०२२ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती प्रकाश पडिया यांच्या खंडपीठाने याचिका पुनर्संचयित केली. यावर आता २५ जुलैला सुनावणी होणार आहे. यामुळे माहेश्वरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

2020 मध्ये ते पहिल्यांदा लोकांसमोर आले होते, भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या विरोधात “निंदनीय” ट्विट केल्याबद्दल भूषण यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने अवमानाची कारवाई करत प्रख्यात वकील प्रशांत भूषण यांना १ रुपये दंड ठोठावला होता.

माहेश्‍वरी हे मूळचे मध्य प्रदेशातील गुना येथील आहेत. ते भारताचे माजी सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचे दूरचे नातेवाईक असल्याचा दावा करतात. जे स्वतः गुनाचे रहिवासी आहेत. माहेश्वरी यांनी सीएचा अभ्यासक्रम इंदूरमध्ये केला. जेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा शेवटच्या टप्प्यावर सीए सोडून ते कायद्याकडे वळले. ते म्हणतात की, मी फक्त मंदिराशी संबंधितच मुद्दे मांडतो असे नाही, तर मी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) संबंधी खटलेही लढवले आहेत.

सुब्रमण्यम स्वामी यांचे गुरू म्हणून वर्णन करणारे माहेश्वरी म्हणतात की, “सुदैवाने, मला २०१८ मध्ये डॉ. स्वामींकडे इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. ते खूप साधे व्यक्ती आहेत आणि मीही साधी व्यक्ती असल्याने आजही मी त्याच्याशी जोडलेला आहे. दरम्यान, मंदिर प्रकरणांव्यतिरिक्त, माहेश्वरी यांनी नॅशनल हेराल्ड आणि सुनंदा पुष्कर यांसारख्या केसेसवरही काम केले. हेराल्ड प्रकरणात स्वामी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर फसवणूक आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोप लावला होता, तर काँग्रेस नेत्यांनी ते निराधार म्हटले होते. २०१४ मध्ये सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी, स्वामींनी एक मोहीम सुरू केली आणि त्यांचे पती, काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. मात्र, दिल्ली न्यायालयाने २०२१ मध्ये थरूर यांची निर्दोष मुक्तता केली.

मेहेक माहेश्वरी यांनी सांगितले की, ‘मी नॅशनल हेराल्ड प्रकरणात आयपीसीचे कलम 409 कसे लागू होते याचा अहवाल तयार केला होता. ज्याआधारावर हे प्रकरण पुढे गेले. राम मंदिर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मी सुप्रीम कोर्टात हजर झालो आणि तिरुपती देवस्थान प्रकरणातही मी स्वामींसाठी कायदेशीर संशोधन केले. माझ्या सर्व मोठ्या खटल्यांचे नेतृत्व स्वामींनी केले आहे. स्वामी हे अनेक वर्षे अयोध्येतील राम मंदिर प्रकरणाचे मुख्य वकील होते. सर्वोच्च न्यायालयाने अखेर 2019 मध्ये मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा केला. तिरुपती देवस्थानने (TTD) एका तेलुगू वृत्तपत्राविरुद्ध याचिका देखील दाखल केली होती. ज्यामध्ये दावा केला होता की, देवस्थानने त्यांच्या वेबसाइटवर येशू ख्रिस्ताचे चित्र प्रदर्शित केले होते.

हेही वाचलत का ?

Back to top button