वाशिम : वेगवेगळ्या दोन अपघातात ३ जण ठार | पुढारी

वाशिम : वेगवेगळ्या दोन अपघातात ३ जण ठार

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यात दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. आज कार व दुचाकीच्या झालेल्या दोन अपघाताच्या घटनांमध्ये ३ जण जागीच ठार झाले आहेत. यातील पहिली घटना मुंबई – नागपूर या महामार्गावरील जऊळका रेल्वे जवळ असलेल्या पुलानजीक घडली.

मालेगावकडे दुचाकीने जात असलेल्या कळमगव्हाण येथील दोन मजुरांना मालेगावकडून येणाऱ्या कारने काटेपूर्णा नदीच्या पुलासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन मजूर जागीच ठार झाले. अपघाताची माहिती जऊळका पोलिसांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेत ॲम्बुलन्समधून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. महामार्गावरील काटेपूर्णा नदीवरील पूल हा अपघात प्रवणस्थळ झाला असून संबंधित विभागाने नवीन पुलाची निर्मिती करण्याची मागणी होऊ लागली आहे.

तर दुसरी घटना रिसोड -वाशिम मार्गावरील सवडजवळ दोन मोटारसायकलचा समोरासमोर अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत रिठद येथील शिक्षक महादेव बोरकर याचा जागीच मृत्यू झाला. तर रिसोड रामनगर येथील दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

Back to top button