Supersonic Missile : भारताचं क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडलं; संरक्षण मंत्रालयानं नेमकं काय घडलं ते सांगितलं! | पुढारी

Supersonic Missile : भारताचं क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडलं; संरक्षण मंत्रालयानं नेमकं काय घडलं ते सांगितलं!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

भारतीय तळावरुन बुधवारी उडालेले एक सुपरसॉनिक क्षेपणास्त्र (Supersonic Missile) पाकिस्तानमध्ये (Pakistan) १२४ किलोमीटर आत जाऊन कोसळले होते. यावर भारताने शुक्रवारी मोठा खुलासा केला. बुधवारी सायंकाळी पाकिस्तानमध्ये पडलेले सुपरसॉनिक क्षेपणास्त्र भारतातील एका तळावरुन चुकून फायर झाले होते, असे भारताकडून सांगण्यात आले आहे. आधीच भारत-पाकिस्तान संबंध चांगले नाही. त्यात भारतातून फायर झालेले क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

पाकिस्तानने शुक्रवारी सकाळी इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांच्या ही बाब निर्दशनास आणून दिली होती. भारतीय बनावटीच्या “सुपरसॉनिक फ्लाइंग ऑब्जेक्ट”ने (Supersonic Missile) त्यांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत पाकिस्तानने या घटनेबद्दल तीव्र निषेध नोंदवला होता. यावर भारतीय संरक्षण मंत्रालयाने (एमओडी) सांगितले की, नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक खराबीमुळे क्षेपणास्त्र उडाले.

भारत सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना अत्यंत खेदजनक असली तरी, या अपघातामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही जेव्हा क्षेपणास्त्र पाकिस्तानी हद्दीत १२४ किलोमीटर आत जाऊन कोसळले होते. असे एमओडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हे तर नॉन-न्यूक्लियर अचूक लक्ष्यभेद करणारे अस्त्र…

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते जमिनीवरुन हल्ला करणारे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र होते. हे एक नॉन-न्यूक्लियर अचूक लक्ष्यभेद करणारे अस्त्र म्हणून ओळखले जाते. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने उडते. हे उत्तर भारतातील भारतीय हवाई दलाच्या तळावरून चुकून उडाले होते.

“भूतकाळात दोन्ही देशांत युद्धे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दोन अण्वस्त्रधारी देशांसाठी ही घडलेली घटना अत्यंत धोकादायक आहे. विशेष म्हणजे जे क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडले त्यावर कोणतेही वारहेड नव्हते. अन्यथा, यामुळे बरेच नुकसान झाले असते,” असे सूत्रानी म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button