Car Mileage : या ‘पाच’ पद्धतीने वाढवा तुमच्या कारचे मायलेज | पुढारी

Car Mileage : या ‘पाच’ पद्धतीने वाढवा तुमच्या कारचे मायलेज

पुढारी ऑनलाईन डेस्क : महागाईचा आगडोंब वाढतच चालला आहे. रोजच्या जीवनातील सर्व आवश्यक गोष्टींचे दर भरमसाठ वाढत आहेत. त्यात इंधनाचे दर तर गगनाला भिडत आहेत. त्यात रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनांचे दर आणखी भडकणार असल्याची शक्यता वारंवार वर्तवली जात आहे. या सर्व महागाईच्या काळात सामान्य नागरिकांचा कल बचतीकडे वाढला आहे. प्रत्येकजण कोणकोणत्या पद्धतीने बचत करता येईल याच्या योजना आखत आहेत. यामध्ये अनेकजणांचा कल इंधन बचतीकडे फार असतो. यासाठी आपण वापरत असलेल्या वाहनाचे मायलेज (Car Mileage) चांगले असणे गरजेचे असते. आपण या पाच पद्धतीने आपल्या वाहनाचे मायलेज वाढवून इंधनाच्या बचतीसोबतच आर्थिक बचत देखिल करु शकतो.

चला तर मग जाणून घेऊ या अशा सोप्या ५ टिप्सबद्दल ज्या लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या कारचे मायलेज (Car Mileage) १० टक्क्यांपर्यंत वाढवू शकता. वास्तविक, अशा अनेक लहानसहान गोष्टी आहेत, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. या निष्काळजीपणामुळे आपल्या गाडीचे मायलेज अचानक कमी होऊ लागते. अशा स्थितीत या ५ गोष्टींची काळजी घेतल्यास आपण केवळ मायलेजच नाही तर कारचे आयुष्यही वाढवू शकतो. चला तर मग बघूया…

एअर फिल्टर (Car Mileage)

कारचे एअर फिल्टर जॅम झाल्यावर कारचे मायलेज कमी होते. त्यात धूळ किंवा मातीचे कण जातात, हे धुळीचे कण अडकून फिल्टर जॅम होते.त्याचा परिणाम गाडीच्या मायलेजवर होतो. म्हणून ठरावीक कालावधी नंतर कारचे एअर फिल्टर तपासत रहा.

टायरमधील हवेचा दाब (Car Mileage)

गाडीच्या टायरमध्ये हवा कमी असेल तर त्याचा थेट परिणाम कारच्या मायलेजवर होतो. अशा स्थितीत कारच्या टायरमध्ये हवा संतुलित ठेवून तुम्ही ३ टक्क्यांपर्यंत मायलेज नियंत्रित करू शकता. कारचे मायलेज वाढवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे त्यात सामान्य हवे ऐवजी नायट्रोजन ( Nitrogen ) हवा भरणे.

ब्रेकचा कमी वापर (Car Mileage)

जर तुम्ही वारंवार ब्रेक लावत असाल तर त्याचा कारच्या मायलेज परिणाम होतो. त्यामुळेच महामार्गाच्या तुलनेत शहरांमध्ये कमी मायलेज मिळत असते. वास्तविक, ट्रॅफिक जाम किंवा सिग्नलच्या वेळी लोक अनेकदा घाईघाईने ॲक्सीलेटर वाढवतात व पुढे जाऊन लगेच ब्रेक लावत असतात. अशा पद्धतीने ॲक्सीलेटर वाढवणे आणि पुन्हा पुन्हा ब्रेक लावणे यामुळे इंधन अधिक जळते व मायलेज कमी मिळते. त्यामुळे चांगल्या मायलेजसाठी ब्रेकचा सुयोग्य वापर करणे लाभदायक ठरते.

सरासरी वेग

सरासरी वेगाने कार चालवून मायलेज ५ टक्क्यांपर्यंत नियंत्रित करता येते. वाहन नेहमी ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास गतीने चालवल्यास मायलेजमध्ये परिणामकारक फरक पडतो. त्याच वेळी, ६० पेक्षा जास्त किंवा २० किमी प्रतितास पेक्षा कमी वेगाने वाहन चालवल्यास इंधनाचा वापर जास्त होतो आणि मायलेज कमी होते.

 

Back to top button