अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण; सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण; सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी

पनवेल :  पुढारी वृत्तसेवा

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रेे हत्याकांडाप्रकरणी शुक्रवारी पनवेलच्या जिल्हा सत्र न्यायालयात न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्यासमोर संगणक तज्ज्ञ सुखदेवराव लोखंडे आणि बंगेरा याची साक्ष नोंदविण्यात आली.

या तज्ज्ञांच्या मदतीने आणि न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य संशयीत बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याचा मोबाईल सीमकार्ड तक्रारदरांसमोर अन्य मोबाईलमध्ये टाकून सुरू करण्यात आला. त्या क्रमांकावरून जीमेल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मिडिया अकाऊंटची तपासणी करण्यात आली. अश्विनी बिद्रे वापरत असलेल्या लॅपटॉपच्या हार्डडिस्क तपासल्या.

अश्विनी यांनी रेकॉर्ड केलेल्या 16 ऑडिओ, 6 व्हिडीओ क्लीप आढळून आल्या. त्याची सत्यता तपासण्यात आली. कुरुंदकरचे व्हॉट्सअ‍ॅप तक्रारदारांसमोर तपासण्यात आले. त्यानंतर उलटतपासणी सुरू झाली. मात्र न्यायालयाची वेळ संपल्याने उर्वरित उलटतपासणी 24 मार्चच्या सुनावणीवेळी होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news