ICC Women’s World Cup : स्मृती मानधनाची बॅट तळपली, वर्ल्डकपमध्ये झळकावले दुसरे शतक | पुढारी

ICC Women's World Cup : स्मृती मानधनाची बॅट तळपली, वर्ल्डकपमध्ये झळकावले दुसरे शतक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने न्यूझीलंड येथे होत असलेल्या महिला विश्वचषक २०२२ च्या १०व्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार खेळी करत शतक साजरे केले. तिने अवघ्या ११९ चेंडू खेळून १०४ च्या सरासरीन आपले शतक झळकवले. विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा तिसरा सामना असून या सामन्यात स्मृती मानधनाच्या बॅट चांगलीच तळपली. या स्पर्धेत ती आक्रमक लयीत फलंदाजी करताना दिसत आहे. स्मृती मानधनाने हॅमिल्टनच्या सेडन पार्कमध्ये केलेल्या शतकामुळे भारताने स्कोर ३०० धावांचा टप्पा पार केला. वेस्ट इंडिजविरुद्ध मोठी धावसंख्या गाठण्यासाठी भारताच्या संघाला एका मोठ्या खेळीची गरज होती. ही खेळी मानधनाच्या बॅटमधून आली

भारताची डावखुरी फलंदाज स्मृती मानधनाने १०४. २४ च्या सरासरीने १०८ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. स्मृती मानधनाचे हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पाचवे शतक आहे. महिला विश्वचषकाच्या इतिहासात स्मृती मानधनाने दुसऱ्यांदा शतक झळकावले आहे. यापूर्वी २०१७ च्या विश्वचषकात तिने शतक झळकवले होते. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ मधील भारताकडून हे पहिले शतक आहे. हे शतक अत्यंत निर्णायक वेळी आले आहे, कारण भारताने चांगली सुरुवात केली परंतु भारताल ह्या कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही. काही काळातच भारताला तीन धक्के बसले. (ICC Women’s World Cup)

स्मृती मानधना ही न्यूझीलंडमधील महिला विश्वचषक २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. तिने आतापर्यंत तीन सामन्यांत एक शतक आणि अर्धशतकाच्या जोरावर २८१ धावा केल्या आहेत. तिच्यापाठोपाठ १६१ धावांसह ऑस्ट्रेलियाची रॅचेल हेन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिने दोन सामने तर मानधनाने तीन डाव खेळले आहेत.

या सामन्यात स्मृती मानधनाने 118 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 123 धावा केल्या. या डावात त्याचा सरासरी १०४.२४ होती. सरासरी वाढवण्याच्या प्रयत्नात स्मृती मानधना बाद झाली. मात्र, भारताला मजबूत स्थितीत नेण्याचे काम तिने केले. ती सलामीला आली आणि ४३ व्या षटकात बाद झाली. तिने भारताची धावसंख्या २६० च्या पुढे नेली होती. तिने प्रथम यास्तिका भाटिया आणि नंतर हरमनप्रीत कौरसोबत मोठी भागीदारी केली आणि संघाला चांगल्या स्थितीत आणले. (ICC Women’s World Cup)

 

Back to top button