संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; हेमंत नगराळेंची महाराज्य राज्य सुरक्षा महामंडळावर नियुक्ती | पुढारी

संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; हेमंत नगराळेंची महाराज्य राज्य सुरक्षा महामंडळावर नियुक्ती

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे महाराज्य राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती झाल्यानंतर संजय पांडे यांची बदली महाराज्य राज्य सुरक्षा महामंडळ व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली होती. आता त्या ठिकाणी हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाली आहे.

रजनीश सेठ नवे पोलीस महासंचालक

राज्याला जनीश सेठ यांच्या रुपाने नवीन पोलीस महासंचालक मिळाले आहेत. गृहमंत्रालयाने शुक्रवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सांभाळत असलेल्या संजय पांडे यांना या पदावरुन पाय उतार व्हावे लागले आहे.

1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या सेठ यांनी फोर्स वनचे प्रमुख, तसेच अप्पर पोलीस आयुक्त आणि मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेचे सह आयुक्त अशा पदांसह राज्याच्या गृह विभागाच्या प्रधान सचिव पदाचीही जबाबदारी चांगल्याप्रकारे सांभाळलेली आहे. ते डिसेंबर 2023 मध्ये सेवनिवृत्त होणार असून या पदावर त्यांना पावणे दोन वर्षांहून अधिक कार्यकाळ मिळणार आहे.

राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या संजय पांडे यांच्याकडे एप्रिल 2021 या राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्याआधी राज्य शासानाने राज्याच्या पोलीस महासंचालकाची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेनुसार एक यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (युपीएससी) पाठविली होती. आयोगाने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात महासंचालकाच्या पात्रता यादीतून पांडे यांचे नाव वगळून महासंचालकपदासाठी हेमंत नगराळे, रजनीश सेठ आणि डॉ. के. वेंकटेशम या तीन अधिकार्‍यांच्या नावांची शिफारस केली होती.

परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर हेमंत नगराळेंची झाली होती नियुक्ती

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई पोलीस दलातील निलंबित सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना स्फोटक प्रकरणात अटक झाल्यानंतर गृहमंत्रालयाला महाराष्ट्र पोलीस दलात महत्वाचे फेरबदल केले होते.

हे ही वाचलं का ?

Back to top button