नाक दाबले रशियाचे, पण डोळे उघडले चीनचे ! घेतला सर्वांत मोठा धडा

नाक दाबले रशियाचे, पण डोळे उघडले चीनचे ! घेतला सर्वांत मोठा धडा

कीव्ह; पुढारी ऑनलाईन : युक्रेनला युद्धाच्या खाईत लोटणाऱ्या रशियाची चौफेर कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समूदायाकडून अनेक पावले उचलली जात आहेत. आर्थिक निर्बंध लादून रशियन अर्थव्यवस्थेला दणका दिल्याने यातून सर्वांत मोठा धडा आता चीनने घेतला आहे.

जगभरातून रशियावरील वाढत्या आर्थिक निर्बंधामुळे चीनने आर्थिक मुद्यांवर धोरणात्मक भागीदारीवर पुनर्विचार सुरु केला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेतही चीनने रशिया किंवा युक्रेनवर कोणतीच भूमिका न घेता तटस्थ राहणे पसंत केले. भारतानेही तोच मार्ग पत्करला. तथापि, रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधाचा चीनने कडाडून निषेध केला.

चीनी मालकीच्या वित्तीय संस्था सुद्धा रशियन अर्थव्यवस्थेपासून अंतर ठेवून आहेत. SWIFT च्या माध्यमातून रशियन वित्तीय संस्थांना बाजूला करून धक्का देण्याचे काम सुरु आहे. SWIFT हे असे नेटवर्क आहे ज्या माध्यमातून बँका पैसे ट्रान्सफर इतर देवाणघेवाण करण्यासाठी सुरक्षित संदेश पाठवला जातो. जवळपास २०० देशातील ११ हजार वित्तीय संस्था SWIFT प्रणालीचा वापर करतात. international financial transfer system चा SWIFT हा मुख्य कणा आहे.

या सर्व बाबींवरून चीन रशियाशी असलेले संबंध ठेवू इच्छित आहेच, त्याचबरोबर समतोल भूमिका घेत आहे. रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेताना दिसून येत आहे. पाश्चिमात्य निर्यात बाजारपेठ आणि अमेरिकेची डॉलर केंद्रीत आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीमध्ये धक्का लागणार नाही याकडे चीनचा कल आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनकडून रशियन ऑईल आणि फर्मशी निगडीत होणारा व्यवहार थांबवला होता. ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रीअल आणि कर्मशिअल बँक ऑफ चायनाला रशियन बाजारपेठेतून खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

चीन आणि रशिया गेल्या काही वर्षात जवळ आले आहेत. अमेरिकन तसेच त्यांच्या भागीदार देशांकडून घालण्यात आलेले निर्बंध हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

फेब्रुवारीच्या सुरुवातीला रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी त्याचे चायनीज समकक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी बीजिंगमध्ये चर्चा केली होती. यावेळी उभय नेत्यांनी दोन्ही देशांच्या मैत्रीला मर्यादा नसल्याचे म्हटले होते. तसेच सहकार्यात्मक बाबींबर कुठल्याच पातळीवर मनाई नसल्याचा दावा केला होता.

या उभय नेत्यांच्या भेटीमध्येच रशियाने चीनला नवीन पाईप लाईनमधून ३० वर्षांच्या करारासह गॅस पुरवठा करण्यावर शिक्कामोर्तब केले होते. चीनने गेल्या वर्षांत रशियाशी १४६.९ बिलीयन डॉलरचा व्यवसाय केला होता.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news