पुणे : …आणि प्रियकरानेच मारला प्रेयसीच्या घरावर डल्ला | पुढारी

पुणे : ...आणि प्रियकरानेच मारला प्रेयसीच्या घरावर डल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्रियकराने प्रेयसीच्या घरात डल्ला मारून 2 लाखांची रोकड, सोन्याचे दागिने असा 3 लाख 7 हजार 500 रुपयांचा किमती ऐवज चोरी करून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.

Gold prices : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने कडाडले; १० ग्रॅमचा दर ५२ हजारांच्या समीप

हे दोघेही चार वर्षांपासून एकत्र राहत होते. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास जनता वसाहत परिसरात घडली. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार दत्तवाडी पोलिसांनी अतुल देशपांडे (वय 28, रा. अकलूज) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Russia-Ukraine war Live Updates : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील ७ जण ठार, लुहान्स्क प्रांतातील दोन शहरांवर ताबा

फिर्यादी महिलेचे नर्सिंग झाले असून, त्या शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करतात. तर आरोपी अतुल हा मुळचा अकलूज येथील असून, तो वाहनचालक म्हणून काम करतो. चार वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली होती. तेव्हापासून ते एकत्र राहत होते. 9 फेब्रुवारी रोजी फिर्यादी या सकाळी कामावर गेल्या होत्या. अतुल हा त्यांच्यासोबत राहत असल्यामुळे त्याला घरातील माहिती होती. याच संधीचा फायदा घेत त्याने कपाटात ठेवलेली चावी घेऊन लॉकरमधील रोकड व दागिने घेऊन पळ काढला.

Russia-Ukraine War : पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला का केला? त्यांना नेमकं काय हवं आहे?

फिर्यादी या घरी आल्या असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. तसेच, प्रियकर अतुल देखील गायब झाला होता. पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Back to top button