Gold prices : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने कडाडले; १० ग्रॅमचा दर ५२ हजारांच्या समीप | पुढारी

Gold prices : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने कडाडले; १० ग्रॅमचा दर ५२ हजारांच्या समीप

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कडाडले असून भारतीय बाजारातही याचे पडसाद उमटले आहेत. (Gold prices)

मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्समध्ये आज (दि.२४) गुरुवारी सकाळी सोन्याचे प्रती १० ग्रॅमचे दर १४०० रुपयांनी वाढून ५१ हजार ७५० रुपयांवर गेले. मात्र दुपारच्या सत्रात हे दर काही प्रमाणात कमी झाले.

युद्धाच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य दिले जाते. रशिया-युक्रेन युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याने जागतिक बाजारात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

Gold prices : १३ महिन्यातील उच्चांकी पातळी

जागतिक बाजारात सोन्याचे प्रति औंसचे १९२५ डॉलर्सवर गेले आहेत. सोने दराची ही गेल्या १३ महिन्यातील उच्चांकी पातळी आहे.

दरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरानेही मोठी उसळी घेतली आहे. ब्रेंट क्रूड तेलाचे प्रति बॅरलचे दर शंभर डॉलर्सच्या वर गेले आहेत.

दुसरीकडे डब्ल्यूटीआय क्रूड तेलाचे दर ९५ डॉलर्सच्या पुढे गेले आहेत. कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे आगामी काळात जगभरात महागाईचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Back to top button