बीड : उसाच्या शेतात गृह रक्षक दलातील जवानांचे प्रेत सापडले | पुढारी

बीड : उसाच्या शेतात गृह रक्षक दलातील जवानांचे प्रेत सापडले

केज (जि. बीड), पुढारी वृत्‍तसेवा :

धनेगाव (जि.बीड) येथे उसाच्या शेतात युसुफवडगाव येथील गृहरक्षक दलातील जवान बेपत्‍ता झाले होते. या जवानाचे प्रेत मेसाई देवी मंदिराच्या परिसरात शिंदे यांच्या शेतात सापडले.

भरत निकम असे मृत जवानाचे नाव असून तो वडगाव ता. केज येथील आहे. या जवानांचे प्रेत सडलेल्या अवस्थेत उसाच्या शेतात सापडले आहे. निकम हे १९ फेब्रुवारी पासून बेपत्ता होते. या बाब युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती स.पो.नि. डॉ. संदीप दहीफळे यांनी दिली.

हे ही वाचा  

Back to top button