नवाब मलिकांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही : चंद्रकांत पाटील

नवाब मलिक राजीनामा द्यावा चंद्रकांत पाटील यांची मागणी www.pudhari.news
नवाब मलिक राजीनामा द्यावा चंद्रकांत पाटील यांची मागणी www.pudhari.news

मुंबई पुढारी वृत्तसेवा :  नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्याने आता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. गंभीर आरोप किंवा अटक झाल्यास राजीनामा देण्याची या राज्याची परंपरा आहे. त्याचे पालन व्हावे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली होती. चौकशी संपल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर येत मलिक यांनी झुकेंगे नही लढेंगे अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आले होते. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकरवर टीका केली आहे. नवाब मलिक केंद्रसरकार विरोधात बोलत असल्यानेच ही कारवाई केल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक ईक्बाल मिर्ची याच्या वरळीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने विकास केला होता. पटेल यांच्या कंपनीने येथे सीजे हाऊस नावाची 15 मजली इमारत बांधून मिर्ची फॅमिलीला तिसर्‍या मजल्यावर 9 हजार चौरस फूट आणि चौथ्या मजल्यावर 5 हजार चौरस फूट असे एकूण 14 हजार चौरस फुटांचे बांधकाम दिले होते. ईडीने ही मालमत्ता जप्त केली आहे. तर, याप्रकरणात ईडीने प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविला आहे.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news