‘ईडी’कडून मला जबरदस्‍तीने अटक : नवाब मलिक | पुढारी

‘ईडी’कडून मला जबरदस्‍तीने अटक : नवाब मलिक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली.

मनी लॉड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिक आज सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. ईडी कार्यालयात ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. सकाळी ७ वाजता ईडीचे अधिकारी चौकशीसाठी मलिकांच्या घरात दाखल झाले होते. त्यानंतर मलिक यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले.

ईडीने मलिक यांना कोर्टामध्ये हजर केले असून युक्तीवाद सुरू आहे. यावेळी नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाईवरून धक्कादायक खुलासा केला. ते म्‍हणाले, मला येथे जबरदस्‍तीने आणले गेले आहे. तसेच माझ्याविरूद्‌ध कोणतेही पुरावे नाहीत. तरीही मला अटक केली आहे. कोणता गुन्हा आहे आणि कोणत्‍या पुराव्याखाली अटक केली आहे हे मला सांगावे, असा युक्तीवाद त्यांनी केला.

हे ही वाचा  

Back to top button