Iphone 14 ची नवीन सीरिज लाॅंच होणार, हे असतील फिचर्स | पुढारी

Iphone 14 ची नवीन सीरिज लाॅंच होणार, हे असतील फिचर्स

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Apple कंपनीने त्‍यांच्या ग्राहकांसाठी आता नवीन iPhone 14 Pro चे उत्‍पादन सुरू केले आहे. या वर्षाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणावर याचे मॉडेल उपलब्‍ध होतील. ॲपल कंपनी ही पुरवठादारांच्या क्षमतांबाबत प्रत्येक गोष्टीची चाचणी घेत असते. आणि त्‍यानंतरच बाजारात नवीन उत्‍पादन कधी सुरू करायचे ते ठरवते.

कंपनीला नवीन उत्‍पादन करणे आणि त्‍यांची गुणवत्ता तपासणी आणि सुनिश्चित होण्यासाठी आवश्यक खरेदी याची कल्पना येत असते. उत्पादनाची पहिल्‍या टप्यातील चाचणी सुरू झाल्यानंतर Apple ने  IPhone 14 Pro चे डिझाइन तयार केले आहे. आयफोन 13 सीरिजच्या तुलनेत नवीन Iphone14 डिझाइनमध्ये ग्राहकांना मोठे बदल अपेक्षित आहेत.

आयफोन 14 चे फिचर्स काय असतील?

आयफोन 14 मध्ये पंच-होल कटआउट असण्याची शक्यता आहे. यामध्ये सेल्फी कॅमेरा असून लीक नुसार आणखी एक पंच-होल कट आउट असावा ज्यात ट्रूडेप्थ कॅमेरा असू शकेल. ज्‍यामध्ये फेस आयडीचे चांगले काम होण्यास मदत हाेईल. तसेच कॅमेरा बंपमध्ये बदल होवू शकतात. IPhone 14 ची ही मालिका आता सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च  होणार असून याची किंमत 99,990 असण्याची शक्‍यता आहे.  आता आयफोन 14 मिनी असणार नाही तर त्याऐवजी iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max असे असू शकतात.

हे ही वाचलं का  

Back to top button