माझ्या आईला सोशल वर्करपासून सेक्स वर्कर करण्यात आले ; गंगूबाई काठियावाडीच्या मुलाचा आरोप | पुढारी

माझ्या आईला सोशल वर्करपासून सेक्स वर्कर करण्यात आले ; गंगूबाई काठियावाडीच्या मुलाचा आरोप

पुढारी ऑनलाईन : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने ‘गंगूबाई’ ची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाबाबत एक नवीन माहिती समोर आली असून हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडल्याचे दिसून येत आहे. गंगुबाईचा मुलगा बाबू रावजी शाह यांनी आईला सोशल वर्करपासून सेक्स वर्कर बनविल्याचा खुलासा केला आहे.

गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारी २०२१ रोजी थिअटरमध्ये भेटीस येत आहे. वास्तविक गंगूबाईच्या कुटुंबीयांना या चित्रपटाची संकल्पना समजली नसून त्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या कुटुंबीयांनीही बदनामी होत असल्याने न्यायालयात धाव घेतली आहे. आता या चित्रपटाबाबत गंगूबाईचे कुटुंबीय आणि तिच्या वकिलाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गंगुबाईचा मुलगा बाबू रावजी शाह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,’ गंगुबाई काठियावाडी या माझ्या आईला सोशल वर्करपासून सेक्स वर्कर बनविले असल्याचा खुलासा केला आहे. तसेच विनाकारण लोक माझ्या आईबद्दल काहीही बोलत असल्याचे देखील सांगितले आहे. गंगूबाईची नात भारती म्हणाली की, निर्मात्यांना फक्त पैसे कमविण्यासाठी हा चित्रपट बनविला असून तिच्या कुटुंबाची बदनामी करत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी या चित्रपट बनविण्यासाठी कुटुंबीयांची संमती घेण्यात आली नसल्याचे देखील सांगितले आहे. तसेच तिने हुसैन जैदी यांनी गंगूबाईंवर ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. यावेळी सुद्धा त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आली नसल्याचा खुलासा केला आहे.

याच दरम्यान गंगूबाईच्या कुटुंबीयांचे वकीलांनी स्पष्टीकरण करताना सांगितले की, गंगूबाई काठियावाडी चित्रपट ज्या प्रकारे बनविण्यात आला आहे त्यात काहीच तथ्य नाही. हे अश्लील आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याला सेक्स वर्कर म्हणून दाखविले गेले आहे. निर्मात्यांनी तिला लेडी डॉन बनविले आहे. गंगूबाईंच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनविल्याने त्याच्या कुटूंबियाना तोंड लपवून राहावे लागत आहे. तर त्यांच्या कुटुंबीयांना सतत घर बदलावे लागत आहे. त्यांनी नातेवाईक गंगूबाई खरोखर सेक्स वर्कर होती का? यासारखे अनेक प्रश्न विचारत असल्याचे देखील म्हटले आहे.

याआधी गेल्या वर्षी २०२१ मध्ये गंगूबाईचा दत्तक मुलगा बाबू रावजी शाह याने या चित्रपटाबाबत न्यायालयात याचिका केली होती. त्यावर न्यायालयाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांना समन्स बजावले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. यासोबतच निर्मात्यांविरुद्धच्या फौजदारी मानहानीच्या कारवाईलाही अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.

याआधी देखील गंगूबाई काठियावाडी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. यावेळी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी चित्रपटाच नाव बदल करण्याची मागणी केली होती. त्यांनी काठियावाडी हे नाव शहराचे असल्याने ते नाव खराब होणार असल्याचे म्हटले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button