रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक नसतानाही डाउनलोड करा आधार कार्ड | पुढारी

रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक नसतानाही डाउनलोड करा आधार कार्ड

पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार कार्डचे महत्त्व कोणापासून लपलेले नाही. बँक खाते उघडणे, वाहन नोंदणी, गृहकर्ज घेणे यासाठीही ते आवश्यक आहे. म्हणूनच ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे आधार वापरणे खूप महत्त्वाचे आहे.

बँकेपासून ते शाळेपर्यंत प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्त्वाचे कागदपत्र आहे. मात्र, अनेकदा मोबाइल नंबर नसल्याने आधार डाउनलोड करणे शक्य होत नाही.मात्र,आता तुम्ही मोबाइल नंबरशिवाय आधार कार्ड डाउनलोड करू शकता. यापूर्वी आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी वापरकर्त्यांकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे आवश्यक होते. तुमचा नोंदणीकृत फोन नंबर जवळपास नसला तरीही आधार कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

IPL : ‘आयपीएल’चा लिलाव होताच RCB ला मोठा झटका!

कसे करणार आधारकार्ड डाउनलोड?

●यासाठी सर्वात प्रथम UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन माय आधार सेक्शनवर क्लिक करा.
●यानंतर Order Aadhaar PVC Card पर्यायावर क्लिक करा.
●आता तुमचा १२ आकडी आधार नंबर टाका.
●येथे तुम्हाला आधार नंबरऐवजी १६ आकडी व्हर्च्यूअल ऑयडेंटिफिकेशन नंबर अर्थात VID चा वापर करावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.
●आता माय मोबाइल नंबर इज नॉट रजिस्टर्ड पर्यायावर क्लिक करा.
●येथे तुम्हाला तुमच्याकडे असलेला दुसरा मोबाइल नंबर टाकावा लागेल.
●आता सेंड ओटीपी बटनावर क्लिक करून ओटीपी टाका.
●आता टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून सबमिट करा.
●या प्रोसेसनंतर तुम्हाला आधार लेटरचा प्रीव्हू दिसेल.
●आता तुम्हाला पेमेंट करावे लागेल. यासाठी मेक पेमेंट पर्यायावर क्लिक करा. पेमेंटनंतर आधार कार्डला पीसीवर डाउनलोड करुनतुम्ही त्याची प्रिंटआउट काढू शकता.

हेही वाचा

IPL : ‘आयपीएल’चा लिलाव होताच RCB ला मोठा झटका!

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर; राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे : राणेंचा आरोप

आधारकार्ड हरवल्यास दोन मिनिटात नवीन तयार करता येईल ! जाणून घ्या कशी आहे प्रक्रिया

Back to top button