Punjab Election : आमच्‍या सर्कशीत माकडाची जागा भरायची आहे : पंजाब काँग्रेसचा आपवर पलटवार | पुढारी

Punjab Election : आमच्‍या सर्कशीत माकडाची जागा भरायची आहे : पंजाब काँग्रेसचा आपवर पलटवार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
पंजाब विधानसभा निवडणूक ( Punjab Election  )  प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. मतदानासाठी काही दिवस राहिले असतानाच राजकीय पक्षांमध्‍ये एकमेकांची खिल्‍ली उडविण्‍याची स्‍पर्धाच लागली आहे. पंजाब काँग्रेस ही एक सर्कस आहे, असा टोला आम आदमी पार्टीचे ( आप ) मुख्‍यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी केले होते. यावर काँग्रसेने पलटवार केला आहे.

वृत्तवाहिनीशी बोलताना भगवंत मान यांच्‍या विधानावर पंजाबचे मुख्‍यमंत्री चरणजीत सिंग चन्‍नी म्‍हणाले की, ” काँग्रेस जर सर्कस असेल तर या सर्कसमध्‍ये एका माकडाची जागा रिक्‍त आहे. आम्‍ही त्‍यांचे स्‍वागत करतो. दिल्‍ली, हरियाणा, उत्तर प्रदेश किंवा अन्‍य कोणत्‍याही ठिकाणी ते आपले तरी अशा माकडांचे आम्‍ही स्‍वागत करु”.

पंजाबमध्‍ये आम आदमी पार्टी ही इंग्रजांसारखीच तोडा आणि फोडा नितीचा वापर करत आहे. आम आदमी पार्टी ही “काला इंग्रज” आहे. हा पक्ष राज्‍यातील जनतेची दिशाभुल करत आहे. पंजाबमधील नागरिकांची लूट करण्‍यासाठी हे इंग्रज निवडणूक लढवत आहेत, अशी बोचरी टीकाही चन्‍नी यांनी यावेळी केली होती.

Punjab Election  : काय म्‍हणाले होते भगवंत मान?

पत्रकार परिषदेत बोलताना भगवंत मान म्‍हणाले की, ” पंजाबमध्‍ये काँग्रेस पक्ष हा एक सर्कस झाला आहे. मुख्‍यमंत्री चन्‍नीसाहेब यांचा पराभव निश्‍चित आहे. ते पुन्‍हा कधीच मुख्‍यमंत्री होणार नाहीत. कारण ते पुन्‍हा कधीच निवडणूक जिंकणार नाहीत”. मान यांच्‍या टीकेवर चन्‍नी यांनी जोरदार पलटवार केला आहे.

हेही वाचा: 

 

Back to top button