उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक : ‘सपा’ला दुसरा धक्‍का, मुलायम सिंह यांचे मेहुणे भाजपमध्‍ये | पुढारी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक : 'सपा'ला दुसरा धक्‍का, मुलायम सिंह यांचे मेहुणे भाजपमध्‍ये

लखनो : पुढारी ऑनलाईन
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘पक्षांतराला जोर आला आहे. एकमेकांचे नेते आपल्‍या पक्षात खेचण्‍यासाठी भाजप आणि समाजावादी पार्टीत जोरदार रस्‍सीखेच सुरु आहे. बुधवारी समाजवादी पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते मुलायमसिंह यादव यांची सुन अर्पणा यादव यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला. यानंतर दुसर्‍याच दिवशी त्‍यांचे मेहुणे, समाजवादी पार्टीचे माजी आमदार प्रमोद गुप्‍ता यांनी भाजपमध्‍ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी प्रमोद गुप्‍ता म्‍हणाले की, सध्‍या समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मुलायमसिंह यादव यांना नजरकैदेत ठेवले आहे. सध्‍या मला पक्षात कोणतेही स्‍थान नाही. सध्‍या समाजवादी पार्टीमध्‍ये गुन्‍हेगार आणि अवैध व्‍यवसाय करणार्‍यांनाच स्‍थान मिळत आहे. त्‍यामुळेच मी समाजवादी पार्टीचा राजीनामा देत भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे.

भाजपने शनिवारी पहिल्‍या टप्‍प्‍यातील १०७ उमेदवारी पहिली यादी जाहीर केली होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत सात टप्‍प्‍यात मतदान होणार आहे. तर निकाल १० मार्च रोजी लागणार आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

 

 

Back to top button