amarinder singh PLC : भाजपसह तीन पक्षांसोबत अमरिंदर सिंग पंजाबमध्ये निवडणूक लढणार | पुढारी

amarinder singh PLC : भाजपसह तीन पक्षांसोबत अमरिंदर सिंग पंजाबमध्ये निवडणूक लढणार

चंडीगड: पुढारी ऑनलाईन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज चंदीगडमध्ये त्यांच्या नवीन पक्ष पंजाब लोक काँग्रेस (PLC) च्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यादरम्यान अमरिंदर सिंग यांनी भाजपसोबत युती करण्याबाबतही बोलले. (amarinder singh PLC)

पत्रकारांशी बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले की, त्यांची पंजाब लोक काँग्रेस भाजपसोबत युती करून पंजाबची निवडणूक लढवेल आणि लवकरच युतीची घोषणा केली जाईल.

प्रियंका चतुर्वेदी यांच्‍यापाठोपाठ शशी थरुर यांचाही सांसद टीव्‍ही अँकरपदाचा राजीनामा

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, आमचा पक्ष, सुखदेव सिंह धिंडसा यांचा पक्ष आणि भाजपमध्ये जागावाटपावर चर्चा होईल. मी आत्ता तुम्हाला अचूक संख्या सांगू शकत नाही. त्याचवेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की, त्यांना युतीकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अपेक्षित आहे का? यावर अमरिंदर सिंग म्हणाले की, सर्व आघाड्या मिळून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर निर्णय घेतील. (amarinder singh PLC)

सिद्धूंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी मतभेद झाल्याने अमरिंदर सिंग यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्ष सोडला होता. यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर अमरिंदर सिंग भाजप नेत्यांच्या सतत संपर्कात होते आणि भाजपच्या अनेक नामवंत नेत्यांना भेटले होते. तेव्हापासून असे बोलले जात होते की अमरिंदर सिंग पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुका भाजपच्या मदतीने लढवू शकतात.

हे ही वाचलं का ?

Back to top button