मोठी बातमी: मायावती निवडणूक लढवणार नाहीत, 15 जानेवारीनंतर बसप उमेदवारांची पहिली यादी | पुढारी

मोठी बातमी: मायावती निवडणूक लढवणार नाहीत, 15 जानेवारीनंतर बसप उमेदवारांची पहिली यादी

पुढारी ऑनलाईन: बसपा प्रमुख मायावती आणि बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. मायावतींनी निवडणूक लढवणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. त्याचवेळी सतीश चंद्र यांनीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सतीशचंद्र मिश्रा यांनी आजपर्यंत कधीही निवडणूक लढवली नाही. सतीश चंद्र हे पक्षाच्या व्यवस्थापनासाठी ओळखले जात असल्याने ते निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

Ind vs SA 3rd Test : विराट कोहलीने टॉस जिंकला, भारताची पहिला फलंदाजी

सतीश चंद्र मिश्रा म्हणाले, ‘मी राज्यसभेचा सदस्य आहे, अनेक राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत आणि बहिण मायावतींना निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवत नाही. निवडणूक न लढवण्याच्या प्रश्नावर सतीशचंद्र मिश्रा म्हणाले की, मायावती निवडणुकीच्या वेळी सभा घ्यायच्या. मायावतींच्या सभा प्रत्येक जिल्ह्यात झाल्या असत्या, पण कोविडमुळे तसे होणार नाही. त्यांचा मुलगा कपिल मिश्रा, मायावतींचा पुतण्या आकाश आनंद हे देखील निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विजयाचा मोठा दावा

बसप सुप्रीमो मायावती यांनी घोषणा केली आहे की, पक्ष सर्व 403 जागांवर यूपी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. इतर कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचे सांगितले आणि 2007 प्रमाणे यावेळीही सत्ता मिळाल्यास सर्व घटकांची काळजी घेईन असे सांगितले. मायावतींनी रविवारी लखनऊमध्ये मागासवर्गीय, मुस्लिम समाज आणि जाट समाजातील पक्षाच्या नेत्यांची मोठी बैठक बोलावली होती.

Vodafone Idea मध्ये सरकारची मोठी हिस्सेदारी, निर्णयानंतर शेअर्समध्ये मोठी घसरण

323 नावे अंतिम

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बसपची 323 तिकिटे निश्चित झाली आहेत. 80 जागांसाठी उमेदवार निश्चित व्हायचे आहेत. बसप प्रमुख मायावती यांच्यासोबत झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत तीन दिवसांत सर्व तिकिटे निश्चित केली जातील, असा निर्णय घेण्यात आला. 15 जानेवारीनंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल.

बडे नेते पक्षाबाहेर

बसपचे संस्थापक कांशीराम यांच्या काळात पक्षाशी निगडित असणारे बहुतेक प्रमुख नेते आता पक्षाबाहेर गेले आहेत. त्या काळात बसपमध्ये माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी, राज बहादूर, आरके चौधरी, दीनानाथ भास्कर, मसूद अहमद, बरखुराम वर्मा, दड्डू प्रसाद, जंगबहादूर पटेल आणि सोनेलाल पटेल असे नेते होते. याशिवाय स्वामी प्रसाद मौर्य, जुगुल किशोर, सतीश चंद्र मिश्रा, रामवीर उपाध्याय, सुखदेव राजभर, जयवीर सिंग, ब्रजेश पाठक, रामचल राजभर, इंद्रजीत सरोज, मुंकद अली आणि लालजी वर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका बजावली आहे.

कोरोना स्थितीवर पंतप्रधान मोदी करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा?

मात्र पक्षात मायावतींचा प्रभाव वाढल्याने एक एक नेते बाहेर पडत गेले. स्वत:चा पक्ष किंवा संघटना स्थापन करून कोणी वेगळा मार्ग निवडला, तर अनेकजण इतर पक्षांत सामील झाले. सध्या सोशल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर म्हटल्या जाणाऱ्या मायावतींनी या विधानसभा निवडणुकीचा विचार करून काय डावपेच आखले आहेत, हे येणारा काळच सांगेल. पण बसप सोडून गेलेल्या पक्षाच्या नेत्यांची भरपाई मायावती कशी करणार आणि नवे चेहरे मायावतींना बळ देऊ शकतील का. या प्रश्नांची उत्तरे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच मिळणार आहेत.

Back to top button