पुणे महापालिका निवडणूक : प्रभागरचनांवरील हरकतीसाठी उरले तीन दिवस | पुढारी

पुणे महापालिका निवडणूक : प्रभागरचनांवरील हरकतीसाठी उरले तीन दिवस

पुणे : पुढारी वृत्तसेवामहापालिका निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी अखरेचे 3 दिवस उरले आहेत. नागरिकांना येत्या सोमवारी दुपारी 3 पर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत.महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना 1 फेब्रुवारी जाहीर करण्यात आली. त्यावर हरकती-सूचना नोंदविण्यासाठी 14 फेब्रुवारी दुपारी 3 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

हिजाब प्रकरण : परराज्यातील मुद्द्यांवरून महाराष्ट्रात संघर्ष करू नये : दिलीप वळसे-पाटील

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडे या हरकती- सूचना नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे.या हरकती नोंदविण्यासाठी आता अवघे 3 दिवस उरले आहेत. त्यात शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही दिवशी पूर्णवेळ हरकती नोंदविता येणार आहेत, तर सोमवारी दुपारी 3 पर्यंतच हरकती घेता येणार आहेत.

पुणे : आळे-पिंपळवाडी, राजुरी-बेल्हेत निवडणुकीचे वातावरण तापणार

गुरुवार अखेरपर्यंत 429 हरकती-सूचना आल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 90 टक्के हरकती प्रभागरचनेच्या प्रारूप प्रभागरचनेवर गेल्या दहा दिवसांत 429 हरकती-सूचना आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने प्रभागांची रचना करताना आयोगाकडून घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शनानुसार झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले असून, जवळपास 90 टक्के हरकती या प्रभागांच्या हद्दीवर आहेत, तर उर्वरित हरकती प्रभागांच्या नावावर घेण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

Hijab row : कर्नाटकातील हिजाब प्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं, अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात पसरवू नका!

IND vs WI 3rd ODI : नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

Ladies Police : पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व कमी!

 

Back to top button