

अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन डेस्क
टीम इंडियाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ९६ धावांनी पराभव केला आणि ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप दिला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर २६६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संघ ३७.१ षटकात १६९ धावांत ऑलआऊट झाला. त्यांच्याकडून ओडियन स्मिथने (३६) आणि कर्णधार निकोलस पूरनने ३४ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ३-३ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादव आणि दीपक चाहर यांनी २-२ विकेट घेतल्या.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली वनडे सामन्यांची मालिका १९८३ मध्ये खेळली गेली होती, तेव्हापासून दोन्ही देशांदरम्यान एकूण २१ वनडे मालिका खेळल्या गेल्या आहेत. भारत विंडीज संघाचा एकदाही क्लीन स्वीप करू शकला नाही. मात्र, वेस्ट इंडिजने वनडे फॉरमॅटमध्ये भारताचा ३ वेळा क्लीन स्वीप केला आहे. आज रोहित आणि कंपनीने इतिहास रचला आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शाई होप (५) याला मोहम्मद सिराजने LBW बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर पुढच्याच षटकात दीपक चाहरने ब्रँडन किंगच्या (१४) खेळीला ब्रेक लावला. त्यानंतर चाहरने शेवटच्या चेंडूवर ब्रुक्सला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. ब्रुक्स शून्यावर बाद झाला.
वेस्ट इंडिजला ६८ धावसंख्येवर चौथा धक्का बसला. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने डॅरेन ब्राव्होला विराट कोहलीकरवी झेलबाद केले. ब्राव्हो ३० चेंडूत २० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार मारले. ब्राव्हो आणि नोकोलस पूरन यांनी ४९ चेंडूत ४३ धावांची भागीदारी केली.
७६ धावसंख्येवर वेस्ट इंडिजला पाचवा धक्का बसला. जेसन होल्डर सहा धावा करून बाद झाला. त्याला १६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माच्या हाती प्रसिद्ध कृष्णाने झेलबाद केले. पुढच्या षटकात म्हणजे १७ व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने फॅबियन ऍलनला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. तो शून्यावर बाद झाला. यावेळी विंडीजची धावसंख्या ७७ होती.
८२ धावांच्या एकूण धावसंख्येवर वेस्ट इंडिजला सातवा धक्का बसला. कर्णधार निकोलस पूरनलाही संघाचा डाव सांभाळता आला नाही. कुलदीप यादवने त्याला बाद केले. पुरनने ३९ चेंडूत ३४ धावा केल्या. १२२ धावसंख्येवर वेस्ट इंडिजला आठवा धक्का बसला. मोहम्मद सिराजने ओडियन स्मिथला शिखर धवनकरवी झेलबाद केले. ओडियनने १८ चेंडूत ३६ धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन चौकार आणि तीन षटकार मारले. त्याने अल्झारीसोबत ३० चेंडूत ४० धावांची भागीदारी केली.
वेस्ट इंडिजला १६९ धावांवर नववा धक्का बसला. हेडन वॉल्श ३८ चेंडूत १३ धावा काढून बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने ३६.२ व्या षटकात रोहितच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर ३७.१ व्या षटकात अल्जारी जोसेफला कोहली करवी झेलबाद करून प्रिसिद्ध कृष्णाने सामन्यावर विजयी मोहोर उमटवली.
तत्पूर्वी, आघाडीची फळी उद्ध्वस्त झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्या सामन्यात 50 षटकांत सर्वबाद 265 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 80, ऋषभ पंतने 56, तर दीपक चहरने 38 धावांचे योगदान दिलेे. विंडीजकडून जेसन होल्डरने 34 धावांत 4 विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. खूप दिवसांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसली; परंतु ही भागीदारी फक्त 21 चेंडूंपर्यंतच टिकली. खेळात सातत्य राखणे रोहितला अवघड गेले. विंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने रोहितची (13) दांडी गूल करत भारताला पहिला धक्का दिला. याच षटकात जोसेफने विराट कोहलीला शून्यावर माघारी धाडले. भारताने 16 धावांत रोहित आणि विराटला गमावले. दुसर्या बाजूला असलेला धवनही तंबूत परतला. अर्धशतकापूर्वी भारताने तीन फलंदाजांना गमावले. आघाडीची फळी कोसळल्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी संघाला आधार दिला. या दोघांनी अर्धशतके ठोकत संघाला दीडशेपार नेले. हेडन वॉल्शने पंतला झेलबाद केले. पंतने 6 चौकार आणि एका षटकारासह 56 धावा केल्या. तर शतकाकडे कूच करणार्या श्रेयस अय्यरला हेडन वॉल्शने ब्रावोकरवी झेलबाद केले. अय्यरने 9 चौकारांसह 80 धावा ठोकल्या. अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर भारताला दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदरची साथ लाभली. चहरने संघासाठी उपयुक्त 38 धावा जोडल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले, तर सुंदरने 2 चौकार आणि एका षटकारासह 33 धावांचे योगदान दिले. भारताने 50 षटकांत सर्वबाद 265 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने 4, तर अल्झारी जोसेफ आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.
२५० धावसंख्येवर भारताला आठवा धक्का बसला. जेसन होल्डरने कुलदीप यादवला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो पाच धावा करून बाद झाला.
२४० धावसंख्येवर भारताला सातवा धक्का बसला. दीपक चहर ३७ चेंडूत ३८ धावा करून बाद झाला. ४५.४ व्या षटकात जेसन होल्डरने शाई होपकरवी त्याला झेलबाद केले.
३७.१ व्या षटकात भारताला १८७ धावांवर सहावा धक्का बसला. श्रेयस अय्यर १११ चेंडूत ८० धावा करून बाद झाला. त्याला हेडन वॉल्शने डॅरेन ब्राव्होकरवी झेलबाद केले. श्रेयसने आपल्या खेळीत नऊ चौकार मारले. वेस्ट इंडिजसाठी ही मोठी विकेट आहे. श्रेयसने वॉल्शने फेकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जागा करून मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू लाँग ऑफच्या दिशेने उंच गेला आणि सीमारेषेजवळ ब्राव्होने चेंडू झेलला.
भारताला १६४ धावांवर पाचवा धक्का बसला. सूर्यकुमार यादव सहा धावा करून बाद झाला. फॅबियन ऍलनने त्याला ब्रूक्सच्या हाती झेलबाद केले. ऍलनने चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकला. त्याची गती संथ होती. त्याचवेळी सुर्यकुमारने पुढे जाऊन ऑफ-साईडमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या काठावर अदळून पॉइंटच्या दिशेने गेला. तिथे क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाही आणि झेल पकडला. या विकेटबरोबतच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.
१५२ धावांच्या एकूण धावसंख्येवर भारताला चौथा धक्का बसला. ऋषभ पंत ५४ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला. हेडन वॉल्शने त्याला विकेटकीपर होपकरवी झेलबाद केले. पंत आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी १२४ चेंडूत ११० धावांची भागीदारी केली.
वॉल्शने वेगाने टाकलेला चेंडू ऋषभ लेट कट मारण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू बॅटच्या आतील कडेला स्पर्श करून विकेटकीपर होपच्या हतात गेला. त्याने कोणतीही चूक न करता झेल पकडला. भारताने महत्त्वाच्या क्षणी एक मोठी विकेट गमावली.
ऋसभ पंतने २८ व्या षटकात ॲलनच्या गोलंदाजीवर एक धाव काढून अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४७ चेंडूंचा सामना करत ५० धावा पूर्ण केल्या. त्याचे वनडे करियरमधील हे पाचवे अर्धशतक आहे. यावेळी भारताची धावसंख्या ३ बाद १४४ होती.
दरम्यान, २७.६ व्या षटकात श्रेयस अय्यरने एक धाव काढून शतकी भागिदारी टप्पा पूर्ण केला.
श्रेयस अय्यरने २६.५ व्या षटकात हेदन वॉल्शच्या चेंडूवर एक धाव काढत वनडे कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. त्याने ७४ चेंडूंचा सामना करून पन्नास धावा पूर्ण केल्या. यावेळी भारताची धावसंख्या ३ बाद १२९ होती.
भारताने १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आहे. वेस्ट इंडिजचे गोलंदाज या जोडीविरुद्ध निष्प्रभ दिसले असून भागीदारी तोडण्यासाठी धडपडत आहेत.
४२ धावांवर तीन गडी गमावल्यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी संयमी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यांनी संघाच्या खात्यात ६७ चेंडूत ५० धावा जोडल्या.
अल्झारी जोसेफने डावाच्या चौथ्या षटकात टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने कर्णधार रोहित शर्माला (१३) बोल्ड केले आणि पाचव्या चेंडूवर विराट कोहली (०) शाई होपकडे विकेटच्या मागे झेलबाद झाला. या दोन धक्क्यांतून सावरण्याचा प्रयत्न होत असतनाच ओडियन स्मिथने शिखर धवनची (१०) विकेट घेत विंडीजला तिसरे यश मिळवून दिले. अवघ्या ४२ धावांत भारताने तिन्ही विकेट गमावल्या.
ओडियन स्मिथने १० वे षटक फेकत होता. त्याचे हे पहिलेच षटक होते आणि त्याने तिस-या चेंडूवर शिखर धवनची शिकार केली. पाचव्या स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू शिखर कट करण्यासाठी सरसावला. पण चेंडू बॅटची कडा घेवून स्लिपमध्ये गेला. जिथे होल्डरने कसलीही चूक केली नाही आणि झेल पकडला. पावरप्लेमध्ये हा भारताला तिसरा झटका होता. शिखर धवन अणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण ही जोडी ओडियन स्मिथने फोडली आणि भारताला तिसरा झटका दिला. स्मिथने शिखर धवनला (१०) धावा माघारी धाडले. यावेळी भारताची धावसंख्या ४२ होती. धवन-अय्यरमध्ये २६ धावांची भागिदारी झाली.
चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जोसेफचा सामना विराट कोहली करत होता. जोसेफने दिशाहीन चेंडू फेकला जो लेग स्टंपच्या बाहेर जत होता. पण कोहलील हा चेंडू फटकावण्याचा मोह आवरला नाही. लेग साईडला बॅट फ्लिक केली. त्याचवेळी चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करून विकेटकीपरच्या हातात गेला. जोरदार अपील झाले. पंचांनी वेस्ट इंडिजच्या बाजूने निर्णय देत विराट बाद असल्याचे जाहीर केले. विराट दोन चेंडू खेळून शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.
अल्झारी जोसेफने चौथ्या षटकाच्या तिस-या चेंडूवर भारताला पहिला झटका दिला. त्याने कर्णधार रोहित शर्माला क्लिन बोल्ड करून पेव्हेलियनच रस्ता दाखवला. रोहितने तीन चौकर फटकावत १५ चेंडूत १३ धावा केल्या.
जोसेफने ऑफ स्टंपच्या बीहेर चेंडू फेकला. रोहितचे पाय क्रीजमध्ये गोठलेले आणि त्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राइव करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या आतील काठावर लागला आणि थेट विकेटवर जाऊन आदळला.
डावात ८ धावा काढताच रोहित शर्मा (२२१ धावा) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा (२१५) विक्रम मोडला. ख्रिस गेल (३१६) आणि राहुल द्रविड (३४२) हे रोहितच्या पुढे आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, कुलदीप यादव, प्रणंद कृष्णा, मोहम्मद सिराज.
शाई होप (विकेटकीपर), ब्रॅंडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शामर ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, हेडन वॉल्श, फॅबियन ऍलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, केमार रोच.
.