तुमच्या स्वप्नातील कार आता रस्त्यावर धावणार; कार इंडस्ट्रीत होणार क्रांती | पुढारी

तुमच्या स्वप्नातील कार आता रस्त्यावर धावणार; कार इंडस्ट्रीत होणार क्रांती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तुम्ही सायन्स फिक्शन चित्रपट पाहिले असतील. अशा चित्रपटांमध्ये हायटेक गाड्या दाखवण्यात येतात, ज्या आपल्याला खूप आकर्षक वाटतात. आपल्या विचारांच्या पलिकडचे फिचर आणि तंत्रज्ञान त्या गाड्यांमध्ये असते. ते बघून आपल्याला वाटते की हे सगळं फक्त चित्रपटांमध्येच होऊ शकतं. परंतु सध्या वाहन उद्योग क्षेत्रात होत असलेल्या वेगवान घडामोडी आणि बदल लक्षात घेता, सायन्स फिक्शन चित्रपटांत दिसणार्‍या गाड्या लवकरच वास्तववादी स्वरूपात आपल्या रस्त्यांवरही धावताना दिसतील, असे म्हणता येईल.

अनेक तज्ज्ञांच्या मते, वाहन उद्योग क्षेत्र आता अशा टप्प्यावर आहे जिथे लवकरच आपल्याला मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. येत्या काही दिवसांत, कार उद्योगात नवीन क्रांती होणार आहे. ज्यामुळे कारच्या डिझाइन, उपकरणे आणि इतर गोष्टींवर मोठा परिणाम आणि बदल होणार आहे. येत्या काळात कोणकोणत्या प्रकारचे फिचर्स असलेल्या गाड्या येणार आहेत आणि त्यांच्या येण्याने ऑटो इंडस्ट्रीत कसा बदल होणार आहे? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

संबंधित बातम्या

Karnataka hijab row : तोपर्यंत कर्नाटकात कॉलेजमध्ये धार्मिक पोशाखांवर बंदी : उच्च न्यायालय

हेड्स अप डिस्प्ले (HUD)

कन्जुमर इलेक्ट्रॉनिक शो म्हणजेच सीईएस 2022 मध्ये, मेटा मटेरियल ब्रँडने एक अनोखे तंत्रज्ञान सादर केले आहे. यामध्ये कारच्या आत एक खास प्रकारचा होलोग्राफिक कन्सोल असेल. या होलोग्राफिक कन्सोलमुळे चालकाला कार चालवणे अधिक सोपे होईल, असा कंपनीचा दावा आहे. चालकाला काहीही करण्यासाठी पुन्हा पुन्हा डिस्प्लेकडे पाहावे लागणार नाही. चालक कार चालवताना देखील होलोग्राफिक कन्सोलद्वारे इतर कामे सहजपणे करू शकेल. या खास तंत्रज्ञानाचे नाव ‘हेड्स अप डिस्प्ले’ असून लवकरच आपल्याला आगामी कारमध्ये हा होलोग्राफिक कन्सोल पाहायला मिळणार आहे.

अन् अजमेरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे झाले सुशोभीकरण

इलेवेट कार

Hyundai ने 2019 च्या सीईएस इव्हेंटमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या कारचे अनावरण केल होते. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे या कारला चाकांबरोबरच पायही आहेत. याच्या मदतीने ही कार पायऱ्या किंवा कोणत्याही उंच ठिकाणी सहजपणे चढू शकते. त्यामुळे भविष्यात, आपल्याला पोर्टेबल कार देखील पहायला मिळू शकतात. ज्या कार अशा रस्त्यावर देखील सहज चालवूू शकतो, जिथे कार चालवणे सध्या कठीण आहे.

रंग बदलणाऱ्या गाड्या

अलीकडेच, BMW ने सीईएस 2022 मध्ये आपली नवीन कार BMW’s iX सादर केली. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती एका टचवर तिचा रंग बदलू शकते. त्यामुळे येत्या काळात अशा अनेक रंग बदलणाऱ्या गाड्याही आपल्याला पाहायला मिळतील.

टीईटी घोटाळ्यातील बोगस शिक्षकांबाबतचा अहवाल होणार सादर

ईव्ही कार

भविष्यात आधिकाधिक कार इलेक्ट्रॉनिक होतील, अशी शक्यता आहे. ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी सर्व देश शून्य उत्सर्जनाच्या दिशेने सकारात्मक पावले उचलत आहेत. त्यामुळे जगभरात इलेक्ट्रॉनिक कारचा ट्रेंड वाढत आहे. याशिवाय भविष्यातील कारमध्ये एआई सेल्फ ड्रायव्हिंग फिचर्स देखील पाहायला मिळतील. हे बदल भविष्यात वाहन उद्योग क्षेत्रात पूर्णपणे बदल करतील, यात शंकाच नाही.

Back to top button