नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या म्हणून बालपरिषदेचे आयोजन | पुढारी

नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या म्हणून बालपरिषदेचे आयोजन

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क : तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि नाशिक मधील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन च्या वतीने ऑनलाइन बालपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 फेब्रुवारी सकाळी १०. ४५ ते १२. ०० या वेळेत ही परिषद पार पडणार आहे.

या बालपरिषदेस 250 विद्यार्थी व 50 शिक्षकांचा समावेश असणार आहे. बालपरिषदेच्या माध्यमातून नाशिक मधील सर्व शाळांनी शिक्षण विभागाने पारित केलेल्या 09 निकषांची पूर्तता करावी असा संदेश दिला जाणार आहे. तसेच नाशिकमधील सर्व शाळा 2022 पर्यंत तंबाखूमुक्त होतील यासाठी फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार असून तसे आवाहन करण्यात येणार आहे. 31 मे जागतिक तंबाखू दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून तोपर्यंत सर्व शाळा तंबाखू मुक्त होतील असे ध्येय बाळगून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक सोबतच मध्यप्रदेश मधील विजयराघवगड येथेही हा उपक्रम राबविला जाणार आहे.

नाशिक मधील सर्व शाळा तंबाखूमुक्त करणे, बालपरिषदेच्या माध्यमातून मुलांना एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करुन देऊन तंबाखूमुक्त शाळा अभियान शालेय आणि गाव स्तरावर सक्षम करणे, मुलांमधील नेतृत्व गुण विकसित करुन तंबाखूमुक्त शाळा अभियानासाठी शासकीय व अशासकीय घटकांचे सहकार्य घेणे ही या बालपरिषदेची उद्दिष्ट्ये आहेत.

नाशिक जिल्ह्यातील तरुण प्रतिनिधींनी एकत्र येऊन नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी बालपरिषद हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. या बालपरिषदेच्या माध्यमातून तंबाखुमूक्त शाळा अभियान सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मध्यप्रदेश येथील विजयराघवगड येथूनही काही विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त गणेश परळीकर, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी पृथ्वीपाल सिंग, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज बांगर, जिल्हा एनटीपीसी सल्लागार शिल्पा बांगर, गटशिक्षणाधिकारी विजयराघवगड (मध्यप्रदेश) ए.के कोरी, जेष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव, प्लांड हेड, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज लखमापूर विजेंद्र बाबू, एव्हरेस्ट इंडस्ट्रीजचे सीएसआर हेड शुभश्री सरकार आदी मान्यवर उपस्थित राहतील.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button