'युपीमध्ये नकली समाजवाद्यांनी 'विकास' थांबवला होता, आता योगी सरकार मेहनत करत आहे' | पुढारी

'युपीमध्ये नकली समाजवाद्यांनी 'विकास' थांबवला होता, आता योगी सरकार मेहनत करत आहे'

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीला मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पार्टीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “उत्तर प्रदेशमधील नकली समाजवाद्यांनी विकासाला थांबवले होते आणि आता योगी सरकार मेहनत करत आहे”, अशी टीका पंतप्रधानांनी केली. (UP Election)

“यहां तक आते आते सूख जाती है नदियां, मुझे मालून है पानी कहां ठहरा होगा”, या कवी दुष्यंत कुमार यांच्या काव्य पंक्तींचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी समाजवादी पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “२०१७ पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये विकासाच्या नदीचं पाणी थांबलेलं होतं. हे पाणी नकली समाजवाद्याच्या कुटुंबात, त्यांच्या कारभारात थांबलेलं होतं. या लोकांना सामान्य लोकांना लागलेली तहान, याच्या काही घेणं-देणं नव्हतं. ते फक्त आपली तहान भागवत राहिले. आपल्या तिजोऱ्यांची तहान भागवत राहिले.” (UP Election)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनचौपाल रॅलीसाठी बिजनौर जाणार होते. तेथून ते आसपासच्या जिल्ह्यांना व्हर्च्युअल मार्गदर्शन केले होते. मात्र, हवामान खराब झाल्यामुळे बिजनौरला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले.

हे वाचलंत का? 

Back to top button