सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला २१ दिवसांची फर्लो रजा मंजूर | पुढारी

सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला २१ दिवसांची फर्लो रजा मंजूर

दिल्ली ; पुढारी ऑनलाईन: हरियाणा सरकारने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला २१ दिवसांची फर्लो रजा मंजूर केली आहे. पंजाब निवडणुकीपूर्वी याला फर्लो रजा मंजूर झाल्याने राजकीय क्षेत्रात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. बलात्काराचा आरोप असणारे गुरमीत राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे.

कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला २१ दिवसांची फर्लो (रजा) मिळाली आहे. फर्लो म्हणजे, ठराविक कालावधीसाठी मंजूर केलेली तात्पुरती रजा, जी कायद्याच्या बाबतीत सामान्यतः दीर्घ कारावास भोगणाऱ्या कैद्यांना दिली जाते. २०१७ पासून तुरुंगात असलेल्या गुरमीत राम रहीमला पहिल्यांदाच तुरुंगातून सुटका होणार आहे. सोमवारी (दि. ७) रोजी सायंकाळपर्यंत त्याला कारागृहातून बाहेर काढण्यात येईल अशी सूत्राच्या माहितीनुसार मिळाली आहे.

गुरमीत राम रहीमला २०१७ मध्ये दोन अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आली होती, त्यानंतर २००२ मध्ये डेराचे माजी प्रबंधक रणजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख आणि इतर चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली होती. सध्या हे सर्वजण रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंचकुला कोर्टाने गुरमीत राम रहीम आणि अन्य चार जणांना ( कृष्णलाल, जसबीर सिंग, अवतार सिंग आणि सबदील) यांना ८ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात दोषी ठरविले होते. या प्रकरणी सीबीआयने त्याना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने डेरा प्रमुख राम रहीमला ३१ लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून नुकसान भरपाई म्हणून पीडितेच्या कुटुंबाला अर्धी रक्कम देण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button