पुण्यात चित्रकाराची लतादीदींना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली | पुढारी

पुण्यात चित्रकाराची लतादीदींना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात ना. सी. फडके चौक येथे लतादीदींना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली रविवारी सायंकाळच्या सुमारास येथील भर चौकात 8 बाय 16 साईजमध्ये लाईव्ह पेंटिंग साकारून निलेश आर्टिस्ट या चित्रकाराने लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. तसेच शहरातील विविध चौकांमध्ये सुद्धा मंडळानी फ्लेक्स लावून, दिदींची गाणी लावून श्रद्धांजली वाहिली.

लतादीदींवर झालेला विषप्रयोग ते पहिली कमाई ! त्यांचे १० किस्से आपल्याला माहीत आहे का?

Lata didi painting
चित्रकार प्रत्यक्ष चित्र काढताना

लता दीदी आणि पुणे हे एक अनोखे ऋणानुबंध जोडले गेलेले आहेत. आज त्या आपल्यातून निघून गेल्या, त्यामुळे पुणेकरांनी दुःख व्यक्त करत शहरात सर्वत्र श्रद्धांजली वाहिली. ना. सी. फडके चौकातील कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे महाराष्ट्राचे चिटणीस आणि नगरसेवक धीरज घाटे यांनी केले होते. हिंदु गर्जना प्रतिष्ठान आणि साने गुरुजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सहकार्य केले.

लता मंगेशकर यांची मनात खोलवर रुजलेली मराठी गाणी !

शहरात बाजीराव रस्ता, समाधान चौक, लक्ष्मी रस्ता, कोथरूड सह उपनगरीय भागात सुध्दा अनेक मंडळांनी फलेक्स लावून, लता दिदींची गाणी वाजवून त्याच्या आठवणींना उजाळा दिला. तर एक महान गानसम्राज्ञी आपल्याला सोडून गेल्यामुळे दुःख व्यक्त केले.

हेही वाचा

लता मंगेशकरांनी भावंडासह बाबांच्या पहिल्या श्राध्दाला घेतल्या होत्या ४ शपथ ! काय आहे तो किस्सा ?

कामाशी एकनिष्ठ व समर्पण वृत्ती ठेवल्यास यश मिळते : लतादिदींचा हुपरीकरांना कानमंत्र

मोगरा फुलला ! लतादीदींची सोलापुरातील अविस्मरणीय आठवण

Back to top button