लतादीदींवर झालेला विषप्रयोग ते पहिली कमाई ! त्यांचे १० किस्से आपल्याला माहीत आहे का? | पुढारी

लतादीदींवर झालेला विषप्रयोग ते पहिली कमाई ! त्यांचे १० किस्से आपल्याला माहीत आहे का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या सुरेल आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. गेली पाच दशके त्यांनी संगीत विश्वावर राज्य करण्याबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या ह्रदयात स्थान मिळवले. आत्तापर्यंत लता मंगेशकर यांनी 30 हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. संगीत विश्वातील अनेक गोष्टी सर्वांना माहिती असल्या तरी अशा काही गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहिती नाहीत.

  • लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी एका मध्यमवर्गीय मराठा कुटूंबात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे एक थिएटर कलाकार आणि गायकही होते. लता मंगेशकर यांचे यापुर्वीचे नाव हेमा होते. मात्र वडील दीनानाथ मंगेशकर यांनी ‘भाव बंधन’ या नाटकातील लतिका नावाच्या कलाकारीला प्रभावित होवून त्यांचे नाव हेमा वरून लता केले होते.

लता मंगेशकर यांची मनात खोलवर रुजलेली मराठी गाणी !

  • लता मंगेशकर जेव्हा पाच वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी आपले वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या संगीत नाटकांमध्ये गायन आणि अभिनयाचे काम सुरू केले होते.
  • शाळेच्या पहिल्याच दिवशी लता मंगेशकर यांनी इतर मुलांना संगीत शिकवायला सुरुवात केली आणि जेव्हा शिक्षकांनी त्यांना थांबवले तेव्हा लतादीदींना खूप वाईट वाटले आणि त्यांनी शाळेत जाणे बंद केले. याबाबत काही सुत्रांचे असे म्हणणे आहे की, लतादीदी त्यांची धाकटी बहीण आशा हिच्यासोबत शाळेत गेल्याने याला आक्षेप घेतला, म्हणून तिने शिक्षण सोडले.
  • लता मंगेशकर ज्यावेळी 13 वर्षांच्या होत्या त्यावेळी वडील दीनानाथ मंगेशकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लतादीदींवर कुटूंब चालवण्याची जबाबदारी पडली. आणि 1940 च्या दशकात संगीत क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी खुप कष्ट घेतले. त्यांनी 1942 मराठी चित्रपट ‘किती हसाल’ यामध्ये गाणे गायले होते. मात्र तो चित्रपट काही कारणास्तव रिलीज झाला नाही.

‘स्वरसम्राज्ञी’च्या आठवणीने पाकिस्तानही गहिवरला ! मंत्री म्हणाले, लोगों के दिलों पर राज करती रहेंगी

  • लता मंगेशकर यांनी पहिल्यांदा स्टेजवर गाणे गायल्यावर 25 रूपये मिळाले होते. ही त्यांची पहिली कमाई होती.
  • जेव्हा लता मंगेशकर 33 वर्षांच्या होत्या त्यावेळी 1962 सालच्या सुरवातीला त्या गंभीर आजारी होत्या. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले होते की, त्यांना खाण्यातून विष देण्यात आले होते. त्या तीन दिवस मृत्यूशी झुंज देत होत्या. यातून बरे झाल्यावर तीन महिने बेडवरच होत्या.
  • 1963 मध्ये लता मंगेशकर यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या आठवणीसाठी ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे गायले होते. त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्याही डोळ्यातूनही पाणी आले होते.
  • लता मंगेशकर या प्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांना आपला गॉडफादर मानत होत्या. कारण हैदर यांनीच पहिल्यांदा लतादीदींवर विश्वास टाकला होता.

हेही वाचा

Back to top button