नाशिक : जेलरोड परिसरात सव्वा आठ लाखांची घऱफोडी ; मंदिराची दानपेटीही लुटली | पुढारी

नाशिक : जेलरोड परिसरात सव्वा आठ लाखांची घऱफोडी ; मंदिराची दानपेटीही लुटली

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा : येथील जेलरोड परिसरात असलेल्या दसक येथील एका बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व घरातील सुमारे सव्वा आठ लाख रुपये रोख चोरून नेल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा दत्तात्रय आढाव यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावलेले असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील मंदिराच्या दानपेटीतील 25 हजार रुपयांसह सुमारे आठ लाख 25 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गणेश नायदे, सहायक पोलिस निरीक्षक शेळके, गोसावी आदींनी धाव घेऊन माहिती घेतली.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button