Sanjay Raut : झुकेंगा नहीं म्हणत संजय राऊत यांचे ट्विट, ममता दीदींचाही केला उल्लेख

Sanjay Raut : झुकेंगा नहीं म्हणत संजय राऊत यांचे ट्विट, ममता दीदींचाही केला उल्लेख
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : ईडीने १ हजार ३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलशी संबंधित प्रकरणात प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नातेवाईकांशी राऊत आणि त्याच्या नातेवाईकांच्या काही व्यवहारांचीही चौकशी ईडी करत आहे. यावर संजय राऊत यांनी ट्वीट करत अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका केली आहे. (Sanjay Raut)

पहले लालच दिया गया, ऑफर्स दिए। फिर डराया, धमकाया गया। तब भी झुका नहीं तो परिवार को धमकाया गया। हमने कहा- छोड़ दो, नजरअंदाज करो इन्हें, जाने दो। तो अब सेंट्रल एजेंसी को हमारे पीछे लगा दिया। चलता है, 2024 तक चलेगा भी..पर हम झुकेंगे नहीं! असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मागच्या दोन दिवसांपुर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. यावेळी संजय राऊत यांनी सोमय्यांवर पलटवार केला होता. राऊत यांच्या निकटवर्तीयांवर आरोप करण्यात आले होते.

Sanjay Raut : नेमके काय आहे प्रकरण ?

ईडीने १ हजार ३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलशी संबंधित प्रकरणात प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नातेवाईकांशी राऊत आणि त्याच्या नातेवाईकांच्या काही व्यवहारांचीही चौकशी ईडी करत आहे.

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळाशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबियांशी सुद्धा प्रवीण राऊत यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळाचे ९० कोटी रुपये हडपले असा आरोप ईडीने केला आहे.

तर, प्रवीण राऊत यांची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होता. या व्यवहारमुळेच प्रवीण राऊत यांची एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news