पुनम महाजन यांनी नामर्द म्हणताच संजय राऊतांकडून ते ट्विट डिलीट ! | पुढारी

पुनम महाजन यांनी नामर्द म्हणताच संजय राऊतांकडून ते ट्विट डिलीट !

मुंबई; पुढारी ऑनलाईन

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप खासदार पुनम महाजन यांनी कडाडून टीका केल्यानंतर ट्विट् डिलीट करण्यात करण्यात आलं आहे. त्या ट्वीटमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित एक कार्टून ट्विट केले होते.

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असणाऱ्या राजकारणात संजय राऊत यांनी टाइम्स आॅफ इंडिया मध्ये प्रकाशित झालेल्या आर.के. लक्ष्मण यांचे कार्टून ट्विट केले होते. ज्यात प्रमोद महाजन (माजी केद्रीय मंत्री ज्यांचे २००६ मध्ये निधन झालं.) बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून निर्देश घेताना दिसत आहेत.

यामुळे भडकलेल्या भाजप खासदार पुनम महाजन यांनी ( ज्या प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत.) यांनी अशाच प्रकारचे ट्विट केले की “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी आघाडी केली होती. संजय राऊत यांनी असे कार्टून टाकून नामर्दानगी दाखवू नये.

प्रमोद महाजन यांची २००६ साली त्यांचा भाऊ प्रवीण महाजन परिवारातील वादातून गोळी मारून हत्या केली होती. हत्या होण्याअदोगर प्रमोद महाजन भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. पुनम महाजन यांना दु:खी होण्याचे कारण नाही कारण ठाकरे आणि महाजन परिवारात जुने संबंध आहेत असे संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्यात २५ वर्षांपासून युती होती. २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपदाच्या वादावरुन दोन्ही पक्षांतील युती तुटली.

हेही वाचलतं का?

Back to top button