क्रिकेट बेटिंगवर गुन्हे शाखेची कारवाई - पुढारी

क्रिकेट बेटिंगवर गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका या शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर बेकायदेशिररीत्या बेटिंग घेणार्‍या एकाला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आणि गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने संयुक्तीकरीत्या कारवाई करीत खडकी येथून बेड्या ठोकल्या.

IPL 2022 : लखनऊ संघाच्या नावाची घोषणा!

पुनित चंदनमल जैन (36, रॉ टॉवर्स, के. जे. रोड, खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रविवारी खडकी बाजार येथील नवा बाजार येथील चंदन हॅन्डलुम्स कपड्याचे दुकान येथे बेकायदेशिररित्या किक्रेट बेटींग सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना मिळाली. याबाबतचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हेशाखेच्या युनिट 2 चे वरिष्ठ निरीक्षक यांच्या पथकाबरोबर संयुक्तीकरीत्या कारवाई जैन याला याप्रकरणी अटक करण्यात आली.

महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर

जैन हा मोबाईलमधील क्रोम या इंटरनेट अ‍ॅपच्या माध्यमातून लोटस, क्रिक बण हे क्रिकेट बेटींग अ‍ॅप लॉगीन करून व्हॉट्सअ‍ॅपवर भारत-दक्षिण अफि—केच्या क्रिकेट मॅचचे बेटींग घेत होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, 2 लाख 68 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, युनिट 2 चे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, युनिट 4च्या सहायक पोलिस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पाडवी, उपनिरीक्षक श्रीधर खडके, श्रीकांत चव्हाण, पोलिस नाईक आण्णा माने, चव्हाण, कोळगे यांनी ही कारवाई केली.

Back to top button