सोलापूर : क्षिरसागर-सरवदे खून प्रकरणातील आरोपीने दिली खुनाची कबुली | पुढारी

सोलापूर : क्षिरसागर-सरवदे खून प्रकरणातील आरोपीने दिली खुनाची कबुली

मोहोळ पुढारी वृत्तसेवा : मोहोळ येथील क्षिरसागर-सरवदे खून प्रकरणात अटकेत असलेल्या भैय्या असवले या आरोपीने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. फरार आरोपींसोबत संगनमताने कट रचून सतीश क्षिरसागर व विजय सरवदे या दोघांचा काटा काढल्याचा कबुलीजबाब त्याने पोलिसांना दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

याबाबत पुढे बोलताना पोलीस निरीक्षक अशोक सायकर म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या गुन्ह्यातील चारही आरोपींनी एका हॉटेल वर बसून सतीश क्षिरसागर व विजय सरवदे या दोघांना ठार मारण्याचा कट रचला होता.

त्यानुसार यापूर्वी एकदा त्यांना मारण्याचा डाव फसला होता. त्यामुळे फरार असलेल्या आरोपींनी भैय्या असवले यास धमकी दिली होती.

त्यामुळे १४ जुलै रोजी भैय्या असवले याने सतीश क्षिरसागर व विजय सरवदे यांना विश्वासात घेऊन जेवायला बोलवले होते.

जेवण करून परतत असताना त्या दोघांच्या दुचाकीवर त्याने टेंपो घातला. त्यामध्ये सतीश क्षिरससागर जागीच ठार झाला. तर विजय सरवदे गंभीर जखमी झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

क्षिरसागर-सरवदे खून प्रकरणात आरोपी भैय्या असवले यास न्यायालयाने 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आम्ही क्षिरसागर-सरवदे खून प्रकरणाचा कसून तपास करत असून फरार आरोपींच्या शोधासाठी दोन पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच फरार आरोपींना अटक करणार असल्याचेही पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

जेव्हा गायिका सुब्बालक्ष्मी संत तुकोबांचा अभंग गांधीजींच्या समोर गातात

Back to top button